‘ भावा आपलं हे शेवटचं बोलणं ‘ , कंपनीतून सुटल्यावर आलेला फोन शेवटचा

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर परिसरात समोर आलेली असून आपले हे शेवटचे बोलणे आहे यानंतर आपले कधीच आयुष्यात बोलणे होणार नाही असे मित्रांना आणि मोठ्या भावाला फोनवर कळवून एका तरुणाने अखेर स्वतःच्या शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे गंगापूर तालुक्यातील कनकुरी येथील ही घटना आहे 27 तारखेला संध्याकाळी हा प्रकार घडलेला आहे

उपलब्ध माहितीनुसार, नारायण अशोक पवार ( वय 26 ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो लिंबेजळगाव येथील एका खाजगी कंपनीत कामाला होता . नेहमीप्रमाणे शनिवारी काम संपून तो कनकुरी गावाकडे निघाला त्यावेळी त्याने त्याच्या मोठ्या भावाला आणि कंपनीतील काही सहकार्यांना फोन करून हे आपले शेवटचे बोलणे आहे यानंतर कधीच बोलणे होणार नाही असा फोन केला आणि त्यानंतर झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

मोठ्या भावाला फोन आल्यानंतर त्याने तात्काळ वडिलांना फोन करून त्याचा शोध घेण्यास सांगितलेले होते म्हणून नारायण याचे वडील अशोक हे संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान शेतात गेले असताना तिथे नारायण याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना खबर देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

नारायण ज्या कंपनीत काम करत होता तेथील काही मित्रांना त्याने आपले शेवटचे बोलणे आहे असे सांगितल्यानंतर त्याच्या कंपनीतील 40 ते 50 मित्रांनी त्याचा शोध घेण्यासाठी त्याचे गाव गाठले होते मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता. कंपनीमध्ये तो दिवसभर सर्वांशी खेळून आणि मिळून मिसळून राहिलेला होता त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव जाणवत नव्हता असे त्याच्या मित्रांनी सांगितले असून अचानकपणे त्याने असा प्रकार का केला ? याचा सध्या तपास सुरू आहे.


शेअर करा