भावा करून दाखवलं.. कांदा काढायला गेले अन ‘ गुड न्यूज ‘ आली की..

शेअर करा

सरकारी नोकरी मिळवणे हे बहुतांश तरुणांचे ध्येय असते आणि त्यासाठी प्रचंड कष्ट घेण्याची देखील त्यांची तयारी असते मात्र अनेकदा त्यात यश येत नाही आणि काहीजण प्रयत्न देखील सोडून देतात मात्र शिरूर तालुक्यातील एका दाम्पत्याने तब्बल चार वर्ष पोलीस भरतीसाठी मेहनत केली.घरची परिस्थिती जेमतेम होती मात्र अचानक या तरुणाला आणि त्याच्या पत्नीला देखील सोबतच यश मिळाले आणि अखेर दोघांच्याही अंगावर आता खाकी वर्दी येणार आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील चांडोह येथील हे दाम्पत्य असून तुषार शेलार आणि भाग्यश्री शेलार अशी या दांपत्याची नावे आहेत. पोलीस भरतीत त्यांचे नाव झळकल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. शेतकरी कुटुंबातील हे दांपत्य असून कुटुंबासोबत कांदा काढण्यासाठी गेलेले असताना त्यांना अचानक ही गुड न्यूज मिळाली आणि त्यानंतर शेतातच त्यांनी चक्क पत्नीला उचलून घेत आनंद साजरा केला. लग्न झाल्यापासून केवळ पोलीस भरती हे एकमेव त्यांचे ध्येय होते मात्र गेल्या काही दिवसांपासून नशीब त्यांना सातत्याने हुलकावणी देत होते.

17 जून 2020 रोजी त्यांचा विवाह झालेला होता. सामान्य कुटुंबातील शेतकरी असलेले तुषार यांना लहानपणापासून पोलीस बनण्याचे आकर्षण होते तर त्यांची पत्नी यांना देखील पोलीस बनण्याची इच्छा होती त्यासाठी गेल्या चार वर्षांपासून सातत्याने तुषार यासाठी प्रयत्न करत होते मात्र अपयश येत असल्याने काही प्रमाणात ते खचून देखील गेलेले होते मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. लग्न होऊन भाग्यश्री त्यांच्या घरात आल्या आणि त्यानंतर त्यांचे भाग्यच उजळले. आपल्या पतीला पोलीस बनवण्यासाठी या अर्धांगिनीने कंबर कसली आणि दुसरीकडे स्वतः देखील त्या प्रयत्न करत होत्या अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आलेले असून दोघांचीही सोबतच पोलिसात निवड झाल्याने संपूर्ण कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे.


शेअर करा