
महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर कालीचरण याच्या जिभेला काही लगाम राहिलेला नाही. एका कार्यक्रमात त्याने देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही असे म्हणत खुनाचे समर्थन केले होते सोबतच छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल देखील त्याने बोलताना जर त्यांनी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण त्यांना पुजले असते का ? असेही तो म्हणाला त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे.
नागपूर येथे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, ‘ कालीचरण हा काही कॅबिनेट मंत्री नाही तो एक वाह्यात माणूस आहे. त्याला हिंदू धर्माबद्दल एवढी आस्था असेल तर त्याने हिंदू मुलांच्या रोजगाराबद्दल बोलावे. हिंदू शेतकऱ्यांचे हाल होत आहेत यावर बोलावे. कालिचरण याच्या भाषेत संताचे कोणतेही गुण दिसत नाही, ‘ असेदेखील मिटकरी पुढे म्हणाले
अमोल मिटकरी म्हणाले की , ‘ साध्वी प्रज्ञा असेल किंवा कालीचरण असेल अशा व्यक्तींना लोकांनी महत्त्व देऊ नये. हा काही खूप मोठा व्यक्ती नाही याच्यात जर तेवढी धमक असेल तर त्याने पाकिस्तान सीमेवर लढायला जावे . चीनच्या बॉर्डरवर जावे आणि त्यांच्याशी दोन हात करावे. मठात बसून गांजा फुकणाऱ्यांनी आम्हाला नको त्या गोष्टी शिकवू नये. ‘
कालीचरण याने एका कार्यक्रमात बोलताना आपले सर्व देवी देवता हिंसक आहेत . आपले देवी-देवता मारामारी करणारे आहे म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो असे म्हणत छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह, महाराणा प्रताप यांनी आपल्यासाठी मारामारी केली नसती तर आपण त्यांची पूजा केली असती का ? देश आणि धर्मासाठी खून करणे योग्य आहे , ‘ असे देखील तो म्हणाला होता.