मणिपूर जळत आहे आणि मोदी हसत विनोद करत आहेत

शेअर करा

मणिपूर हिंसाचार प्रकरणी केंद्र सरकारवर टीका करताना राहुल गांधी यांनी चार महिन्यांपासून मणिपूर जळत असून पंतप्रधानांनी अशा परिस्थितीत संसदेत हसणे आणि विनोद करणे हे शोभणारे नाही अशी खरमरीत टीका केलेली आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली त्यावेळी ते म्हणाले की , ‘ पंतप्रधान मोदी यांना असे वाटते की मणिपूर जळावे आणि राज्याला जळू द्यावे . केंद्र सरकारला हिंसाचार थांबवायचा असेल तर सर्व संसाधने सरकारच्या हातात आहे जेणेकरून अवघ्या काही तासांच्या आत मणिपूर हिंसाचार थांबवता येईल .

राहुल गांधी पुढे म्हणाले की , मणिपूरमध्ये रोज महिला आणि मुले मरत आहेत. महिलांची छेडछाड अत्याचार होत आहेत आणि देशाचे पंतप्रधान संसदेच्या मध्यभागी बसून चक्क हसत आहेत. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली हे मी बोललेले वक्तव्य हे पोकळ नव्हते. मी पंतप्रधानांना दोन तास बोलत हसत आणि मस्करी करताना पाहिलेले आहे. माझा माझ्या सैन्यावर पूर्णपणे विश्वास आहे . प्रत्येक भारतीयाला माहित आहे की जर भारतीय सैन्याला हा हिंसाचार संपवण्याचे आदेश दिले तर अवघ्या काही तासांच्या आत संपूर्ण मनिपुरमध्ये शांतता निर्माण होईल , ‘ असे देखील ते पुढे म्हणाले .


शेअर करा