
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार नागपूर येथे समोर आलेला असून मध्यरात्रीच्या सुमारास नवीन कपडे घालून फेसबुक लाईव्ह करत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नवीन कामठी परिसरातील कुंभारे कॉलनी येथील ही घटना असून मयत तरुणाचे वय 27 वर्ष असल्याचे समजते.
उपलब्ध माहितीनुसार, कृतांक सिद्धार्थ डोंगरे ( वय 27 ) या तरुणाचे नाव असून चार वर्षांपूर्वी त्याचे लग्न झालेले होते मात्र काही दिवसानंतर त्याचा आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरू झाला आणि अखेर दोन दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी निघून गेलेली होती तेव्हापासून तो नैराश्यात गेलेला होता. त्याचे नातेवाईक कामानिमित्त सोमवारी बाहेर गेलेले होते त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास कृतांक याने नवीन कपडे घातले आणि दीडच्या सुमारास मोबाईलवर तो फेसबुकवर लाईव्ह आलेला होता.
सुरुवातीला त्याने पंख्याला कपडा बांधला आणि कपडा तुटतो का हे पाहिले आणि त्यानंतर कपाळाला टिळा लावला सोबतच मी आत्महत्या करत आहे असे म्हणत त्याने गळफास घेतला. फेसबुक लाईव्हवर एका नातेवाईकाला तो गळफास घेताना दिसला म्हणून त्याने कृतांक याच्या शेजाऱ्याला याप्रकरणी माहिती दिली . शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला मात्र तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झालेला आहे. कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे