‘ मन्या भिडेच करायचं काय ..’ , मनोहर भिडेंच्या कपाळाला पुण्यात टिकली

शेअर करा

मनोहर भिडे यांनी एका महिला पत्रकाराशी बोलताना तू आधी कुंकू लाव असे वक्तव्य केले होते. सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका करण्यात आली त्यानंतर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून टिकली न लावता आंदोलन करण्यात आले त्या वेळी आंदोलकांनी मनोहर भिडे यांच्या फोटोला टिकली लावून आपला निषेध व्यक्त केलेला आहे.

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माजी नगरसेविका संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी त्यांनी मनोहर भिडे यांच्यावर जोरदार टीका करत, तुम्ही आधी घरातून सुरू करा नंतर पत्रकारांना सांगा. तुमच्या सुनबाई अमृता फडणवीस तुमच्यासमोर तशाच येतात ना .. त्या तर महाराष्ट्राच्या वहिनी आहेत मग त्यांनीही कुंकू टिकली लावली पाहिजे आधी घरातून सुरुवात करा ‘, असा हल्लाबोल केलेला आहे.

संगीता तिवारी पुढे म्हणाल्या की, ‘ आम्हाला शिकवणारे तुम्ही कोण ? संविधानाने आम्हाला कसं राहायचं काय कपडे घालायचे याचा हक्क दिलेला आहे. उद्या तुम्ही जीन्स, टी शर्ट घालू नका, डोक्यावर पदर घ्या असंही सांगाल. हा काय तालिबान आहे का ? हा भारत देश असून शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने चालतो. बायकांनी कुंकू लावायचे की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण ? तुम्ही भारतमाता धर्मांध केलेली आहे. आमची भारतमाता सर्वांना सामावून घेणारी असून तुमच्यासारख्या माथेफिरूने आणि धर्मवेड्यानी भारतमातेचे नाव खराब केलेले आहे मात्र आम्ही ते होऊ देणार नाही. तुम्ही कोणत्या ब्रँडची धोतर घाला हे आम्ही तुम्हाला सांगितलं नाही ‘, असा देखील टोला त्यांनी पुढे गेला आहे.


शेअर करा