‘ मराठा समाजाला फसवू शकत नाही , ‘ मनोज जरांगेंपुढे मंत्रीही हतबल

शेअर करा

जालना जिल्ह्यात पोलिसांनी मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठीचार्जनंतर राज्यभरात देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार यांच्याविरोधात संतापाचे वातावरण पाहायला मिळत असून राज्य सरकारमधील तीन मंत्री आणि माजी दोन मंत्री यांनी उपोषण करण्यासाठी बसलेले मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र अखेरपर्यंत त्यांनी नमती भूमिका घेतलेली नाही. मराठवाड्यातील मराठ्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यावे त्यासंबंधीचा जीआर आणा माझे उपोषण लगेच मागे घेतो , असे त्यांनी ठणकावले आहे.

मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दात सर्व मंत्र्यांना आपली भूमिका समजावलेली असून , ‘ मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या मराठा समाजाला फसवू शकत नाही. अनेक चांगल्या घरामधील मराठा समाजाची मुले आत्महत्या करत आहेत. सरकारी भरती तोंडावर आहेत मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होऊ द्या. तुम्ही देवदूत व्हा . आरक्षण दिले तर मराठवाड्यातील हा मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल मात्र तोपर्यंत मी माझे उपोषण मागे घेणार नाही. मला मुंबईला येण्याचा आग्रह धरू नका .’

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे राज्यभरात प्रतिसाद उमटत असून अशा परिस्थितीत राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री आणि राज्य सरकारचे मंत्री हे मनोज जरांगे यांच्यासमोर हतबल झालेले दिसून येत आहेत. शिष्टमंडळाने सुमारे तासभर मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली मात्र शासनाच्या अध्यादेशाशिवाय मी मागे हटणार नाही अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी घेतलेली आहे.

मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना ,’ मागील महिन्यात देखील सरकारने वेळ मागितली होती तेव्हा चार दिवसांऐवजी आठवडाभर वेळ दिला मात्र सरकारने निर्णय घेतलेला नाही. आता पुन्हा तुम्हाला एक महिन्याचा वेळ मी देऊ शकत नाही कारण शेवटी आमच्या देखील जीवनमरणाचा प्रश्न आहे. संपूर्ण समाजाचा रोष मी माझ्या अंगावर घेऊ शकत नाही. घरी कुटुंबाला सांगितले आहे आलो तर येईल नाहीतर समाजाचा होईल निघाला. निघाली तर आरक्षणाची जल्लोष यात्रा निघेल नाहीतर माझी प्रेतयात्रा पण आता माघार नाही ‘ , अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारला ठणकावले आहे.


शेअर करा