‘ मला मरायचं नाही मुलासाठी जगायचंय ‘, सासूने पेटवले तेव्हा पती चक्क..

शेअर करा

सोशल मीडियावर साध्या एका वेगळ्या प्रकरणाची चर्चा सुरू असून मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे हे येथील हे प्रकरण आहे. गुरुवारी संध्याकाळी ग्वाल्हेर येथे भाजलेल्या अवस्थेत एक तरुणी आढळून आलेली होती. सुदैवाने ती जिवंत असल्याने तिला दवाखान्यात दाखल केले त्यानंतर तिने मृत्यूपूर्व जबाब दिलेला असून त्यामध्ये सासरी आपला छळ होत होता म्हणून सासूने आपल्याला पेटवून दिले असे सांगितले आहे. सासू सदर प्रकार करत असताना आपला नवरा हा घराबाहेर होता असे देखील तिने सांगितले.

उपलब्ध माहितीनुसार, रेश्मा असे मयत तरुणीचे नाव असून तिचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात शोकाकुल वातावरण पाहायला मिळते आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिचा पती असलेला वासू आणि ती यांचा प्रेमविवाह झालेला होता. आपल्यासोबत घडलेल्या या प्रकारानंतर तिने मृत्युपूर्व जबाबात ‘ मला जगायचं आहे मरायचं नाही ‘ असे सांगितले होते आणि त्यानंतर पुढे फक्त मुलासाठीच जगायचे असे देखील ती म्हणाली होती मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला.

ग्वाल्हेर येथील सेवा नगरमध्ये ती राहत होती. दोन वर्षांपूर्वी मुरार येथील वासू शिवहेर नावाच्या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. दोघांचे धर्म वेगळे असल्याने कुटुंबातून या लग्नाला विरोध होता मात्र कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी लग्न केले आणि त्यानंतर ती तिच्या पतीसोबत वेगळी राहू लागले. सासू रजनी हिचे आणि रेश्मा यांचे कधीच पटत नव्हते. रजनी ही वेळोवेळी येऊन तिला दमदाटी करत असायची तसेच मारहाण देखील करायची.

अशाच झालेल्या वादातून सासूने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले त्यानंतर सासू तिथून निघून गेली. परिसरातील नागरिकांनी रेश्मा हिला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तिच्या माहेरच्यांना या प्रकाराची माहिती समजताच त्यांनी रुग्णालय गाठले आणि पोलिसांना या प्रकाराची खबर दिली .

मृत्यूपूर्व जबाबात रेशमा हिने सासूने आपल्या अंगावर पेट्रोल टाकून आपल्याला पेटवून दिले त्यावेळी पतीने घराबाहेर उभे राहून फक्त बघ्याची भूमिका घेतली आणि सासूला हे करण्यापासून रोखले नाही. त्याच्यावर आता आपला विश्वास राहिलेला नाही, मला मरायचं नाही तर माझ्या मुलासाठी मला पुढे जगायचे आहे असा तिने मृत्यूपूर्व जबाब दिलेला असून तिच्या या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच सासू आणि पती हे फरार झाले असून त्यांच्या शोधार्थ पोलिसांनी पथके रवाना केली आहे .


शेअर करा