महत्वाचा निर्णय..अखेर ‘ त्या ‘ क्लिपची ऑनलाईन विक्री थांबली

शेअर करा

नवीन आलेल्या सर्व कारच्या मॉडेलमध्ये सीट बेल्ट अलार्म कंपल्सरी असून सीट बेल्ट लावला नाही तर गाडी चालवताना सतत त्याची जाणीव करून देणारा आवाज सुरू राहतो. हा अलार्म वाजू नये यासाठी स्टॉपर क्लिप ऑनलाईन विकत असल्याचे प्रकार समोर आलेले होते. वेगवेगळ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी या संदर्भात सुरुवातीला दुर्लक्ष केले मात्र अखेर ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने आदेश दिलेला असून आता 13000 पेक्षा अधिक अशा पद्धतीची उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आलेली आहेत.

सीट बेल्ट अलार्म बायपास करण्यासाठी या क्लिपची ऑनलाईन विक्री केली जात होती. अवघ्या काही रुपयात मिळणारी ही क्लिप प्रवाशांचे आयुष्य एका प्रकारे धोक्यात टाकत आहे असे लक्षात आल्यानंतर प्रकरण ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे गेलेले होते . विमा कंपन्यांनी देखील अशी क्लिप वापरली तर दावा करणारा व्यक्ती हा हलगर्जीपणा करत आहे असे सांगून दावाच फेटाळला जाऊ शकतो असे संकेत दिलेले होते त्यानंतर या उत्पादनांची ऑनलाइन विक्री आता बंद करण्यात आलेली आहे.


शेअर करा