
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारी एक बातमी सोलापूर जिल्ह्यात समोर आलेली असून सोलापुरातील दिग्गज माजी भाजप नेते श्रीकांत देशमुख यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या निर्मला यादव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे. याआधी देखील निर्मला यादव यांनी अनेक व्हिडिओ बनवत देशमुख यांच्यासोबत त्यांचे भाऊ यांच्यावर देखील खळबळजनक आरोप केलेले आहेत सोबतच याप्रकरणी गप्प राहिल्यावरून चंद्रकांतदादा पाटील आणि चित्रा वाघ यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधलेला आहे.
अवघ्या काही मिनिटापूर्वी व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये निर्मला यादव यांनी हा व्हिडिओ आपला शेवटचा व्हिडिओ असून यापुढे आपला चेहरा आपल्यावर टीका करणाऱ्या व्यक्तींना दिसणार नाही असे देखील त्यांनी म्हटलेले आहे. श्रीकांत देशमुख यांच्यासोबत आपण लग्न केले होते आपला देखील एकेकाळी संसार होता मात्र आपण कुठलीही जबरदस्ती त्यांना केली नाही त्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत लग्न केले आणि त्यानंतर त्यांच्या घरचे व्यक्ती आपल्याला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार देत आहेत असे त्यांनी म्हटलेले आहे.
काही महिन्यांपूर्वी एका हॉटेलच्या रूममधील श्रीकांत देशमुख आणि निर्मला यादव यांचा एक व्हिडिओ भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेला होता त्यानंतर श्रीकांत देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. सदर प्रकरण सध्या कोर्टात असून निर्मला यादव यांनी अनेकदा फेसबुकवर लाईव्ह करत आपली व्यथा मांडलेली आहे. काही मिनिटांपूर्वी त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेला असून त्यामध्ये त्यांनी श्रीकांत देशमुख यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी , अजित पवार , चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे.
निर्मला यादव यांनी म्हटल्याप्रमाणे श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत सात फेरे घेऊन विवाह केलेला आहे. पंढरपूर येथे आम्ही जोडीने दर्शनाला देखील अनेकदा गेलेलो आहोत मात्र तरीदेखील मोठ्या भावाच्या दबावामुळे श्रीकांत देशमुख हे आपल्याला पत्नी म्हणून मानण्यास नकार देत असून आपल्यासोबतचे सर्व संपर्क तोडून आपल्यावरच दबाव आणण्याचे काम करत आहेत सोबतच आपल्यावर केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत असेही त्यांचे म्हणणे आहे . बेटी बचाव बेटी पढाव यासारखे नारे देऊन भाजपने आम्ही महिलांच्या हक्कासाठी किती लढतो असे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी भाजप पक्षाला मात्र अनेकदा त्यांच्या नेत्यांच्या कृत्यामुळे मान खाली घालावी लागते आणि स्वतःच्या पक्षातच असे प्रकार समोर आल्यावर भाजपच्या महिला नेत्या देखील गप्प राहतात असे अनेकदा दिसून आलेले आहे .