महाराष्ट्रात पुन्हा ‘ एक दुजे के लिये ‘ ? , विवाहिता घरात तर प्रियकर मात्र ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सांगली जिल्ह्यातून समोर आलेली असून सांगलीच्या जत तालुक्यातील रामपूर येथे एका प्रेमीयुगुलाने आपले जीवन संपवलेले आहे. दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केलेली असून हा प्रकार उघडकीला आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटना ही आत्महत्या आहे की घातपात याविषयी परिसरात चर्चा सुरू आहे.

रामपूर गावातील हे प्रकरण असून कोळेकर वस्ती येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत. उमेश अशोक कोळेकर आणि प्रियंका बाळासाहेब कोळेकर अशी मयत व्यक्तींची नावे असून प्रियंका या विवाहित असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. कोळेकर वस्तीवरील उमेश कोळेकर यांचा मृतदेह शेतामध्ये असलेल्या एका ओढ्याजवळ आढळून आला. त्यांच्या मृतदेहाच्या शेजारी विषाची बाटली देखील सापडली तर दुसरीकडे प्रियंका बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केली.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रियंका कोळेकर यांनी जत पोलीस ठाण्यात मयत उमेश कोळेकर यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केलेली होती त्यानंतर हा प्रकार घडल्याने या घटनेमागे आत्महत्या आहे की घातपात ? याची देखील चर्चा सुरू झालेली आहे. जत पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केलेली आहे.


शेअर करा