महाराष्ट्रात शाईफेक तर इथे दगडफ़ेक , भाजप नेत्याचे हेल्मेट घालून भाषण

शेअर करा

देशातील आणि राज्यातील महापुरुषाबद्दल सतत वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने भाजप नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर नागरिकांचा चांगलाच धसका घेतलेला असून स्वतः चंद्रकांत पाटील हेदेखील पुण्यातील एका कार्यक्रमात फेसशील्ड लावून आलेले दिसून आले होते.

भाजपच्या नेत्यांसोबत हा प्रकार केवळ महाराष्ट्रातच झाला आहे असे नाही तर छत्तीसगडमधील भाजप नेते आणि माजी मंत्री असलेले अजय चंद्राकर यांनी देखील दगडफेकीच्या भीतीने क्रिकेटचे हेल्मेट घालत छत्तीसगड येथील दुर्ग येथील एका सभेत सहभागी झाले होते. याआधी देखील त्यांच्यावर दगडफेक झाली होती त्यामुळे त्यांनी मंगळवारी हेल्मेट घालून भाषण केले.

भाषणाच्या वेळी चंद्राकर म्हणाले की, ‘ सदर व्यक्ती केवळ माझ्यावरच नाही तर छत्तीसगडच्या लोकांवरही दगडफेक करत आहेत. काँग्रेसकडून राजकारणात असभ्य भाषेचा वापर वाढलेला आहे. आमदाराच्या सभेत दगडफेक होऊ शकते तर कायद्याची काय परिस्थिती असेल याचा अंदाज सर्वसामान्य व्यक्तींना येऊ शकतो म्हणून मी हेल्मेट घालून भाषण करत आहे ‘ .


शेअर करा