महाराष्ट्र लाचार आहे असे दाखवण्याचा ‘ हा ‘ प्रयत्न

शेअर करा

महाराष्ट्र लाचार

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील वाद सध्या शिगेला पोहोचलेला असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बेताल वक्तव्याला काही सीमा राहिलेली नाही. दुर्दैवाने कर्नाटकला ठणकावून सांगण्यात महाराष्ट्राचे सत्ताधारी नेते बोटचेपी भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये ‘ महाराष्ट्र लाचार आहे ‘ असे दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला असून त्यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री हे गृहमंत्री अमित शहा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना दिसत आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यापासून बरेच अंतर ठेवून उभे आहे आहेत. हा फोटो म्हणजे महाराष्ट्र लाचार आहे असे दाखवण्याचा हा प्रयत्न करण्यात येत आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटलेले आहे.

आपल्या पोस्टमध्ये अमोल मिटकरी म्हणतात की, ‘ केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि यांच्यापासून दूर असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री. हे चित्र पाहून कर्नाटक पुढे महाराष्ट्र लाचार आहे असे चित्र उभे करण्याचा हा भाजपाचा डाव आज उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्र पाहतोय.’, त्यांच्या या पोस्टवर अनेक जणांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.


शेअर करा