महिलेने चक्क ब्लॅंकेटसोबत केले लग्न , बॉयफ्रेंडही होता उपस्थित

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका आगळ्यावेगळ्या विवाहाची जोरदार चर्चा सुरू असून एका ब्रिटिश महिलेने तिचे कुटुंबीय मित्र आणि बॉयफ्रेंड यांना सोबत घेत चक्क पांघरून म्हणून घेत असलेल्या ब्लॅंकेटसोबत लग्न केलेले आहे. महिलेने म्हटल्याप्रमाणे ब्लॅंकेटला पाहिल्यानंतर की तिच्या ती त्याच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर तिने या ब्लॅंकेटसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला

उपलब्ध माहितीनुसार, पास्कल सेलिक असे या महिलेचे नाव असून आपण हे ब्लॅंकेट पाहिले आणि त्यानंतर पाहता क्षणीच आपण त्याच्या प्रेमात पडलो आणि त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला असे म्हटलेले आहे . जाहीरपणे तिने या विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले होते माझे ब्लॅंकेट हाच माझा विश्वासू साथीदार आहे असे देखील तिने म्हटलेले आहे.

एका टीव्ही शोमध्ये बोलताना तिने आपल्याकडे अशी अनेक ब्लॅंकेट आहेत मात्र जेव्हा आपण प्रथम हे ब्लॅंकेट पाहिले त्याचवेळी आपण त्याच्या प्रेमात पडलो आणि माझ्या सुखादुखात हे ब्लॅंकेट सतत माझ्यासोबत असते असे सांगितलेले आहे.


शेअर करा