महिलेला घरात गुप्तधन असल्याची स्वप्ने अन पंधरा फूट खड्डा , मांत्रिक ताब्यात पण तोपर्यंत ..

शेअर करा

सांगली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी गुप्तधन प्रकरणात सामुहिक हत्याकांडाचा प्रकार समोर आला होता. कोल्हापूर जिल्ह्यात देखील अशीच एक घटना समोर आली असून करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथे एका शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिस तपासात हा खून देखील गुप्तधन मिळवण्याच्या कारणावरून झालेल्या आर्थिक व्यवहारातून झाल्याचे समोर आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आरती आनंद सामंत असे मयत महिलेचे नाव असून या प्रकरणात मुख्य मांत्रिक असलेला नामदेव शामराव पोवार ( वय 34 ) याला अटक करण्यात आलेली आहे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास 45 वर्षीय आरती सामंत यांचा खून झाल्याचे प्रकरण समोर आले होते त्यानंतर मयत महिला ही एका फोन नंबरवर सतत संपर्कात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले तेव्हा त्याने या प्रकरणाची कबुली दिलेली आहे.

आपल्या घरात गुप्तधन असल्याचे असल्याची स्वप्ने या महिलेला पडत होती आणि काही मांत्रिकांना तिने संपर्कात घेऊन आपल्याला गुप्तधन काढून द्या त्यात तुम्हाला काही हिस्सा देईल असेही सांगितले. त्यानंतर पुलाची शिरोली येथे असलेला हा मांत्रिक याची आणि आरती या महिलेची ओळख झाली त्यानंतर त्याने गुप्तधनाच्या लालसेपोटी महिलेला तिच्या घरात पंधरा फूट खड्डा खोदण्यात सांगितले होते त्यासाठी महिलेचा बराच खर्च झाला तसेच आरोपीने पैसे देखील घेतले होते. ते परत मागत असल्याने आरोपीने तिचा खून केला हे समोर आलेले आहे .


शेअर करा