‘ माझ्या गाडीत रिवॉल्वर ठेवून..’ , करुणा शर्मा यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

शेअर करा

शिवशक्ती सेना पक्षाच्या सर्वेसर्वा करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांना निशाण्यावर ठेवत एक फेसबुक पोस्ट केलेली असून त्यांच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. करुणा शर्मा यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट केलेली असून त्यामध्ये खोट्या केसमध्ये अडकवणं, पैशाच्या जोरावर त्रास देणे अशा कारणांनी मी झुकणार नाही , ‘ असे लिहिलेले आहे.

काय आहे करुणा शर्मा यांची पोस्ट ?

माझ्या गाडीत रिवॉल्वर ठेवून खोट्या केसमध्ये मला अडकवलं.. घाणेरडे व्हिडिओ बनवून माझी गाडी आणि घर देखील हिसकावण्याचा प्रयत्न केला.. जेवढी ताकत लावायची तेवढी लावा तुझ्या पैशापुढे झुकली नाही आणि खोट्या ताकतीपुढे देखील ही नारी शक्ती आहे

मागील वर्षी करुणा शर्मा यांनी परळी येथे पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी त्यांच्या गाडीत रिव्हॉल्वर आढळून आले होते. सदर रिव्हॉल्वर कोणी ठेवले याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता. करुणा शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा देखील आरोप त्यावेळी ठेवण्यात आलेला होता आणि त्यांना तुरुंगवासदेखील भोगावा लागलेला होता. महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर देखील त्यावेळी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. करुणा शर्मा यांनी अनेकदा फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. करुणा शर्मा यांच्या या फेसबुक पोस्टवर धनंजय मुंडे आता काय उत्तर देणार ? याची चर्चा सुरू झालेली आहे.


शेअर करा