मुंबईत स्टेरॉईडचा ‘ ओव्हरडोस ‘ , असं काही होईल याचा अंदाजच नव्हता

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना ठाणे इथे समोर आलेली असून जिम ट्रेनर म्हणून काम करत असलेल्या एका मुलाने जन्मदात्या आई-वडिलांवर चाकूने वार करून त्यांना जखमी केलेले आहे. सदर घटनेत मुलाच्या आईचा मृत्यू झालेला असून वडील देखील गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, आरोपी तरुणाचा आई-वडिलांसोबत वाद झालेला होता त्यातून त्याने हल्ला केला त्यावेळी त्याची आई विनीता यांचा मृत्यू झाला तर वडील विलास यांच्यावर उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी मुंबई श्री 2019 चा मानकरी देखील होता. एका जिममध्ये सध्या तो ट्रेनिंग देण्याचे काम करत असून तो मोठ्या प्रमाणात स्टेरॉईडचे सेवन करत होता त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला होता असे घरच्यांनी सांगितलेले आहे.

पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केलेली असून त्याचे नाव संकल्प भाटकर असे असल्याचे समजते. विनिता विलास भाटकर असे त्याच्या मयत झालेल्या आईचे नाव असून त्याचे वडील विलास हे गंभीररीत्या जखमी झालेले आहे. स्टेरॉईडच्या वाढत्या सेवनामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडत चाललेली होती. शारीरिक दृष्ट्या जरी तो फिट असला तरी मानसिकदृष्ट्या त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला होता त्यातून त्याने हे कृत्य केल्याची चर्चा आहे .

देशभरात अनेक ठिकाणी जिममध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट विकण्यासाठी ठेवलेले असतात आणि तरुण कुठलीही शहानिशा न करता त्याचे सेवन करतात. याआधी देखील एका व्यक्तीला अशाच पद्धतीने स्टेरॉईडचे सेवन केल्याने पाठीच्या कण्याला इजा झाली होती आणि त्यानंतर तो अंथरुणाला खेळलेला होता. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही पद्धतीची औषधे घेऊ नयेत असे वैद्यकीय सल्लागार यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे.


शेअर करा