मुख्यमंत्री मोदीजी की प्रधानमंत्री मोदीजी को कड़ी चेतावनी , काय आहे प्रकरण ?

शेअर करा

रुपयाची किंमत दिवसेंदिवस डॉलरच्या तुलनेत ढासळलेली पाहायला मिळत असून रुपयाने 82 ची पातळी कधीच ओलांडली आहे म्हणजे एक डॉलर विकत घेण्यासाठी आता तब्बल 82 डॉलर मोजावे लागत असून इंधनाच्या दरात देखील वाढ होण्याची संकेत आहेत. गेल्या काही दिवसात केंद्र सरकारने जी आर्थिक नीती अवलंबिलेली आहे त्यामुळे रुपयाची किंमत सतत घसरत असल्याची टीका होत आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये ते , ‘ मी सत्तेत बसलेलो आहे अशा पद्धतीने रुपया घसरत नाही ‘, असे म्हणत नेहमीप्रमाणे केंद्र सरकारला दोष देत आहेत अर्थात त्यावेळी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. सदर व्हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पंतप्रधान मोदी यांना आता नागरिक ट्रोल करत आहेत.

मोदींनी त्या वेळी केंद्रांमध्ये बसलेल्या काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली होती तेव्हा ते बोलताना, ‘ रुपया घसरत चालला आहे पण केंद्र सरकारला मात्र काहीच वाटत नाही. मंत्रिमंडळ आपापल्या खुर्च्या वाचण्यात व्यस्त आहे. दिल्ली सरकार आर्थिक व्यवस्था सांभाळण्यात अयशस्वी झालेले आहे म्हणून महागाई वाढत आहे त्यामुळे देश खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, ‘ असे म्हटले होते. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलेला आहे .


शेअर करा