मुस्लिम व्यक्तींना व्यवसायास परवानगी नाही , ग्रामपंचायतींचे अघोरी फर्मान

शेअर करा

जशी जशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तसे तसे प्रत्येक राज्यात धार्मिक धृवीकरणासाठी वातावरण तापलेले पाहायला मिळत असून हरियाणामध्ये काही दिवसांपूर्वी दंगल सुरू झालेली होती त्यानंतर त्याहून संतापजनक असा प्रकार हरियाणातील महेंद्रगड , रेवारी, नांगल आणि झाझर जिल्ह्यात समोर आलेला असून काही ग्रामपंचायतींनी चक्क मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचे अघोषित फर्मान जारी केलेले आहे. समाजमाध्यमात हे पत्र आल्यानंतर संताप व्यक्त केला जात असून हरियाणा सरकारने संबंधित ग्रामपंचायत आणि सरपंच यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , 31 जुलै रोजी हरियाणातील नुह जिल्ह्यामध्ये हिंसाचार सुरू झालेला होता त्यानंतर दोन्ही धर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न गोदी मीडियाने केले आणि ग्रामीण पातळीवर देखील या हिंसाचाराची चर्चा झाली त्यानंतर काही ग्रामपंचायतींनी चक्क मुस्लिम व्यक्तींना कोणताही व्यापार करण्याची परवानगी देण्यासच नकार दिलेला आहे . धक्कादायक बाब म्हणजे यात गोरगरीब कुटुंबातील फेरीवाले , गुरांचे व्यापारी आणि काही भिक्षा मागणारे व्यक्ती यांचा समावेश आहे. सदर पत्र ग्रामपंचायतींनी जारी केलेले पत्र सोशल मीडियात आल्यानंतर या ग्रामपंचायती आणि तेथील सरपंचांना हरियाणा सरकारकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेले आहे


शेअर करा