मेडिकल कॉलेजमध्ये मैत्री करणारी कोणी साधीसुधी नव्हती तर..

शेअर करा

मैत्री

देशात सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून इंदूर येथील या प्रकरणात कॉलेजमध्ये रॅगिंग रोखण्यासाठी चक्क एक महिला पोलीस विद्यार्थिनी बनवून या कॉलेजमध्ये पोहोचली होती. त्यानंतर पाच महिने ही महिला पोलीस विद्यार्थिनी बनून मेडीकल कॉलेजमध्ये रॅगिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेत होती त्यानंतर अकरा जणांची ओळख पटवुन त्यांना अटक करण्यात आलेली आहे तर काही विद्यार्थी फरार झालेले आहेत.

जुलै महिन्यात एमजीएम कॉलेज इथे एक गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून विद्यार्थिनींची रॅगिंग घेण्यात येत असल्याचे प्रकरण व्यवस्थापनाच्या कानावर आले होते त्यानंतर त्यांनी संयोगिता नगर येथे पोलिस ठाण्यात तक्रार केली मात्र ट्रेनिंग घेणारे हे विद्यार्थी कोण आहे याची पोलिसांना कल्पना नव्हती तसेच त्यांची नावे देखील स्पष्ट होत नव्हती मात्र पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे ठरवले आणि महिला पोलीस असलेल्या शालिनी चौहान ( वय 24 ) यांना चक्क कॉलेजमध्ये विद्यार्थिनी म्हणून पाठवले.

सुरुवातीला विद्यार्थ्यांना सदर तरुणी ही आपल्या सोबतच शिकण्यासाठी आलेले आहे असे वाटले मात्र त्यांची कुणी रॅगिंग घेतली नाही. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तासन्तास त्या बसून असायच्या आणि त्यानंतर त्यांनी हळूहळू तेथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीशी मैत्री केली आणि रॅगिंगसंदर्भात संभाषण केले त्यानंतर त्यांना कॉलेजमधील एका एका प्रकारची माहिती मिळत गेली आणि त्यानंतर आरोपींची निश्चिती करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती देण्यात आली . पोलिसांनी त्यानंतर तात्काळ कारवाई करत काही विद्यार्थ्यांना अटक केली आहे तर काही विद्यार्थी हे फरार झालेले आहेत.


शेअर करा