मोदींनी उपस्थिती लावलेली शाळा झाली ‘ गायब ‘ , पहा व्हिडीओ

शेअर करा

रेवडी कल्चरवरून विरोधकांना खडे बोल सुनावणारे मोदी प्रत्यक्षात मात्र रोज नवीन नवीन प्रकल्प आणि नवनवीन आश्वासने गुजरात येथील नागरिकांना देत आहेत. मोदी यांनी केलेले भूमिपूजन यापैकी किती प्रकल्प पूर्ण झाले हा एक संशोधनाचा विषय असून गुजरातमध्ये मोदी यांनी एका शाळेत शिक्षणविषयक उपक्रमाचे उद्घाटन केले होते. सदर शाळा ही फिल्मी इव्हेन्ट असल्याची टीका इंटरनेटवर अनेक जणांनी व्यक्त केली होती प्रत्यक्षात देखील असाच प्रकार समोर आलेला असून मोदी यांनी भेट दिलेली शाळा गायब झाल्याचे समोर आले आहे.

काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलेला असून त्यामध्ये केवळ एक सांगाडा दिसत आहे आणि ज्या ठिकाणी ही शाळा होती आणि पंतप्रधान मोदी बसलेले होते येथील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे .आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की ‘ काल ज्या शाळेत मोदी बसून अभ्यास करीत होते. आज ती शाळाच गायब झालेली आहे. मस्त शाळा बनवली होती ‘, असेदेखील त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या ‘ शाळेत केवळ पाच विद्यार्थी, शाळेला खिडकीचे लावलेले चित्र आणि राखाडी रंगाचे कार्पेट ‘ हा फक्त चित्रपटाचा सेट आहे अशा देखील प्रतिक्रिया हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आलेल्या होत्या अर्थात केंद्र सरकारकडून अशाच स्वरूपाचे अनेक प्रकार आधीही केले गेलेले आहेत . निव्वळ बनावटगिरी आणि फोटोशॉप याच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून मात्र आता नागरिकांच्या हे प्रकार लक्षात येऊ लागलेले आहेत.


शेअर करा