
महाराष्ट्रातील लावणीस्टार गौतमी पाटील हिचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून त्यामध्ये ती चेंजिंग रूममध्ये स्वतःचे कपडे बदलताना आढळून येत आहे. गौतमी पाटीलच्या डान्सवर याआधी देखील अनेक जणांनी टीका केलेली आहे मात्र तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीका करणाऱ्या व्यक्तींनी पद्धतशीरपणे मौन बाळगलेले आहे तर दुसरीकडे नेटिझन्स मात्र या प्रकरणाकडे गौतमी पाटील हिच्या बाजूने सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. गौतमी पाटीलचा डान्स जर वाईट असेल तर चोरून तिचा व्हिडिओ शूट करणे हे त्याहीपेक्षा निंदनीय कृत्य असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील या प्रकरणी ट्विटरवर माहिती दिलेली असून , ‘ मी महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळविले आहे . लावणी कलाकार गौतमी पाटील यांच्या चेंजिंगरूम मधील खाजगी व्हिडिओ समाज माध्यमांमधून प्रसारित केल्यात गेल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे येथे तक्रार नोंदवल्याचे देखील वृत्त आहे. महिलांच्या प्रति सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे सदर प्रकरणी विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कारवाई मोहीम लाभल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील, असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.
गौतमी पाटील ही अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेली असून प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर अनेक कार्यक्रमांसाठी तिला बोलवण्यात येते त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत आणि दिग्गज अभिनेत्री यांची असणारी डिमांड कमी झालेली असून त्यामुळे गौतमी पाटील हिला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची देखील चर्चा आहे .तिच्या प्रसिद्धीमुळे अनेक जणांची दुकाने बंद झालेली आहेत म्हणून काहीही करून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत असून गौतमी पाटील हिचा चोरून व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी देखील तिच्या चाहत्यांकडून करण्यात येत आहे.