.. म्हणून चक्क बंदूकधारी साधू बँकेत घुसला अन फेसबुक लाईव्ह केले सुरु

शेअर करा

देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून बँकेमध्ये सर्वसाधारण शेतकरी असलेल्या व्यक्तीला कर्ज देण्यास नकार दिला जातो. कितीही प्रामाणिकपणे शेतकऱ्याने कर्जाची परतफेड केली असली तरी बँका शेतकऱ्याला कर्ज देण्यास सहसा टाळाटाळ करतात मात्र एक वेगळाच प्रकार तामिळनाडूतील तिरुवरुर येथे समोर आलेला असून एक साधू चक्क बंदूक घेऊन बँकेत लुटण्यासाठी दाखल झालेला होता. आपण करत असलेल्या कृत्याचे तो फेसबुक लाइव्ह देखील करत होता मात्र पोलिसांनी अखेर त्याला अटक केली.

उपलब्ध माहितीनुसार, साधूचे नाव तिरुमलाई स्वामी असे असून त्याची मुलगी चीन येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. तिच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचण असल्याने तो कर्ज मिळावे म्हणून साधू सिटी युनियन बँकेत गेला होता त्यानंतर बँकेने या साधूला कर्जाच्या बदल्यात संपत्तीची कागदपत्रे मागितली त्यावेळी साधूने पैसा तुम्हाला व्याजासोबत परत मिळणार आहे तर मग संपत्तीची कागदपत्रे का मागत आहात ? असा प्रश्न विचारला. साधूच्या या प्रश्नाने बँकेच्या अधिकार्‍यांचा इगो दुखावला आणि त्यांनी कर्ज देण्यास नकार दिला.

बँकेकडून नकार समजतात साधू संतप्त झाला आणि त्याने घर गाठले. घरी गेल्यानंतर साधूने आपली रायफल घेतली आणि पुन्हा त्याच बँकेत येऊन तिथे धूम्रपान करत कर्मचाऱ्यांना धमकावणे सुरू केले. बँकेने लोन देण्यास नकार दिला म्हणून आपण बँक लुटण्यासाठी आलेलो आहोत असे सांगत आपल्या कृत्याचे त्याने फेसबुक लाईव्ह स्ट्रीमिंग देखील सुरू केले दरम्यानच्या काळात पोलिसांना या घटनेची सूचना देण्यात आली आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन साधूला अटक केली. सदर प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे समजते.


शेअर करा