..म्हणून तब्बल 28 वर्ष भीक मागून काढली , पोलीस पोहचले तेव्हा चक्क..

शेअर करा

महाराष्ट्रात एक अजब प्रकरण समोर आलेले असून अमरावती येथील या घटनेत बायकोच्या खुनाचा आरोपी असलेला आरोपी संपूर्ण आयुष्य भिकारी म्हणून काढत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. तब्बल 28 वर्ष हा फरार होता त्यानंतर अमरावतीच्या ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. सदर व्यक्ती वृद्ध झाल्यानंतर दरम्यानच्या काळात आलेले आधार कार्ड बायोमेट्रिक ओळख या सर्वांपासून तो लांब असल्याकारणाने अटक केलेल्या आरोपीला ओळख पटवण्यासाठी पोलिसांना देखील मोठी मेहनत करावी लागणार आहे. 22 फेब्रुवारी रोजी त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या होत्या.

उपलब्ध माहितीनुसार, नुरुल्ला खान वजीरउल्ला खान ( वय 62 राहणार ब्राह्मणवाडा थडी ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून 1995 साली त्याने त्याच्या पत्नीचा छळ केलेला होता त्यानंतर तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यात खुनाचे कलम देखील वाढवण्यात आले त्यानंतर तो फरार झालेला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र त्याची कुठलीच माहिती समोर येत नव्हती.

ब्राह्मणवाडा पोलिसांना गुप्त सूत्रांच्या माध्यमातून तो सध्या भिकारी म्हणून उदरनिर्वाह करतो असे समोर आल्यानंतर पोलिसांनी मुस्लिम बांधवांच्या एका धार्मिक कार्यक्रमात तो जेवणासाठी येतो त्यामुळे तो दिसल्यानंतर तात्काळ पोलिसांना कळवा अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या त्यानुसार तो या कार्यक्रमात आला आणि ब्राह्मणवाडा पोलिसांनी अमरावतीतील ट्रान्सपोर्ट नगर मध्ये एका ठिकाणी त्याला रात्री दोनच्या सुमारास लंगडत असताना ताब्यात घेतले आहे .


शेअर करा