म्हणून तरुणीने स्वतःच्या आधी पन्नास वर्षीय आईचे लग्न लावले

शेअर करा

आईचे लग्न

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली असून एका पंचवीस वर्षाच्या तरुणीने आपल्या पन्नास वर्षीय आईचे दुसरे लग्न लावून दिले आहे. देवआरती चक्रवती असे या मुलीचे नाव असून तिने तिची आई असलेली मौसमी चक्रवती यांचा दुसरा विवाह लावून दिला. देवआरती ही दोन वर्षांची असतानाच डॉक्टर असलेल्या तिच्या वडिलांचे निधन झाले होते त्यानंतर आईने तिचे पालनपोषण केले. आपले लग्न झाल्यानंतर आईचे काय होणार या चिंतेतून तिने हा निर्णय घेतल्याचे समजते.

देवआरती ही दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले होते त्यानंतर देवआरती आणि तिची आई मौसमी हे शिलॉंग येथे तिच्या आजीच्या घरी राहायला आले. तिची आई शिक्षिका होती त्यामुळे तिने नोकरी सांभाळत देवआरती हिला लहानचे मोठे केले आणि त्यानंतर तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरू केले. आपले लग्न झाल्यानंतर आपल्या आईचे कसे होणार ही चिंता तिला होती त्यामुळे तिने आईसाठी दुसऱ्या लग्नाचा आग्रह धरला मात्र आईने त्याला विरोध केला.

देवआरती सध्या मुंबईमध्ये नोकरी करत असून संपत्तीवरून तिचा तिच्या काकांशी देखील वाद झालेला होता मात्र अखेर आईचे मन वळवण्यात तिला यश आले आणि पश्चिम बंगालमधील स्वपन नावाच्या एका व्यक्तीसोबत मोसमी यांनी दुसरा विवाह केला. लग्नाला तीन महिने झाल्यानंतर देवआरती हिने त्यांचा फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलेला असून अनेक जणांनी त्याचे कौतुकही केले आहे.


शेअर करा