.. म्हणून महाराष्ट्रातील आदिवासी महिलांनी रस्त्यावरच फोडला टाहो : पहा व्हिडीओ

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हा व्हिडिओ मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामावरील असल्याचा दावा करण्यात येत आहे. सदर व्हिडिओ पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील असल्याचा व्हिडिओ दावा करण्यात आलेला असून भूसंपादनाच्या कारवाईत प्रशासनाची असुरी आणि राक्षसी भूमिका पाहायला मिळाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. नगर चौफेर ह्या व्हिडिओची पुष्टी करत नाही मात्र हा व्हिडीओ अत्यंत भयावह आहे.

कारवाई करत असताना प्रशासन इतक्या खालच्या स्तराला उतरले की अक्षरशः या कारवाईत आदिवासी महिलांना विवस्त्र अवस्थेत ओढण्यात आलेले आहे त्यावेळी बाधित होणाऱ्या महिलांचा आक्रोश ह्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे . कुठल्याही भावनाशील व्यक्तीला व्यथित करणारा हा व्हिडिओ असून आदिवासी बांधवांनी अद्यापही किती हाल अपेष्टा सहन करायच्या ? असे व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेले आहे.

देशाच्या महिला राष्ट्रपती असताना देखील पालघर येथील महिलांवर चक्क निर्वस्त्र होण्याची दुर्दैवी वेळ आली याविषयी देखील संताप व्यक्त केला जात असून बुलेट ट्रेन आणि वडोदरा एक्सप्रेस या प्रकल्पांसाठी आदिवासी समाजावर अन्याय का सुरू आहे ? याबद्दल देखील व्हिडिओत भाष्य करण्यात आलेले आहे कपिल केळकर यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे.


शेअर करा