
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालना इथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज प्रकरणावर संताप व्यक्त केलेला असून ‘ आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यामागे नक्कीच कुणाचातरी हात आहे अशी माहिती मला मिळालेली आहे . तिथे सरकारला सरकार आपल्या दारी आणि थापा मारते भारी हा कार्यक्रम घ्यायचा होता त्यामुळे आंदोलकांना तिथून उठवायचं होतं म्हणून लाठीचार्ज करण्यात आला ,’ असे म्हटलेले आहे
उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘ सरकारकडून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात येणार होता म्हणून आंदोलकांना तिथून उठवायचं होतं. आंदोलकांना त्यांच्या व्यथा प्रशासना पुढे सांगायच्या होत्या. कोणीतरी आपलं म्हणणं ऐकून घ्यावं अशी त्यांची इच्छा होती त्यातून पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यानंतर लाठीमार सुरू झाला , ‘ असे म्हटलेले आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘ पोलीस इतके राक्षस होऊ शकतात का ? सरकार म्हणते सखोल चौकशी करू आणखी किती सखोल जाणार. आरक्षण म्हणजे लोकांना न्याय हवा आहे. सगळ्यांना समान न्याय द्या. कायद्यासमोर सगळे नागरिक समान आहेत ‘, असे देखील ते पुढे म्हणाले.