
भाजप सरकारवर टीका केली की सोशल मीडिया अकाउंट बंद होतात किंवा त्यावर रिस्ट्रिक्शन्स लागतात अशा अनेक घटना समोर येत असून असाच प्रकार पुन्हा एकदा प्रसिद्ध भोजपुरी गायिका नेहा सिंह राठोड हिच्यासोबत घडलेला आहे. ‘ यूपी मे का बा ‘ म्हणजेच यूपीमध्ये काय आहे याविषयी नेहा सिंग राठोड हिने एक गाणे शेअर केलेले होते . सदर गाणे जोरदार व्हायरल झाले आणि त्यात कायदा सुव्यवस्थेचे पूर्णपणे धिंडोरे निघत असताना त्यामध्ये कामाची टिमकी वाजवणाऱ्या भाजप सरकारवर तीने प्रश्न उपस्थित केलेले होते तेव्हापासून ती सोशल मीडियावर टीकेची धनी झालेली होती.
नेहा सिंग राठोड हिने म्हटले आहे की बुधवारी संध्याकाळपासून त्यांचे फेसबुक अकाउंट अनेक जणांनी रिपोर्टिंग केल्यामुळे बंद झालेले आहे. आपण जी टीका केली त्यावरील फेसबुकची ही प्रतिक्रिया योग्य नसून यासंदर्भात अधिक माहिती नेहा सिंह राठोड हिने तिच्या ट्विटर अकाउंटवरून दिलेली आहे. आपले फेसबुक अकाउंट अनेक दिवसांपासून हॅक करण्याचा देखील प्रयत्न केला जात होता त्यानंतर अखेर फेसबुक अकाउंट बंद करण्यात आले असे देखील तिने म्हटलेले असून आलोचकांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार योग्य नाही असेही म्हटलेले आहे.