रशियाकडून चक्क ‘ ही ‘ सोशल मीडिया कंपनीच दहशतवादी घोषित

शेअर करा

सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप या तीनही कंपन्यांची मालकी एकाच कंपनीकडे असून नागरिकांच्या मानसिकतेवर परिणाम करण्यासाठी फेसबुकसह हे तीनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात भूमिका बजावतात. रशिया युक्रेन युद्धाच्यावेळी मेटाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून रशियाने यानंतर मेटाच्या विरोधात दहशतवादी संघटना असल्याचा आरोप ठेवत बंदी घातलेली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अतिरेकी कारवाई केल्याबद्दल ही बंदी घालण्यात आली असून युक्रेनमध्ये रशियाने लष्करी कारवाई केली त्यावेळी मेटा कंपनीने रशियाच्या विरोधात मोठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असे सांगण्यात आलेले आहे.

रशियाने युक्रेनच्या पावर स्टेशनवर हल्ले सुरू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पाऊल उचलण्यात आलेले असून अमेरिकेने रशियावर विविध निर्बंध लादलेले आहेत त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने देखील अनेक अमेरिकन नागरिकांना आपल्या देशात प्रवेश बंदी केली आहे त्यामध्ये फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांचे देखील नाव आहे.

युद्ध सुरू झाल्यानंतर फेसबुकवर लोकांनी रशियाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिलेल्या होत्या आणि फेसबुकच्या देखील कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. फेसबुक फीडमध्ये काय दाखवायचे हे पूर्णपणे फेसबुकच्या हातात असल्याने फेसबूक अनेकदा वादात सापडलेली आहे. सत्ताधारी पक्षांना विरोधी पक्षाने प्रश्न विचारला तर त्याची बातमी लोकांपर्यंत पोहोचतच नाही अन पोचली तर अत्यंत कमी लोकांपर्यंत पोहोचते त्यामुळे विरोधी पक्षांचा देखील एक प्रकारे आवाज दाबला जातो अशी टीका याआधी देखील फेसबुकवर अनेकदा करण्यात आलेली आहे. इंस्टाग्रामवर देखील अशाच पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचा आवाज दाबला जातो असे आरोप करण्यात आलेले आहेत. फेसबुककडून दहशतवादी संघटना घोषित करण्यात आल्यानंतर आता काय भूमिका घेतली जाते हे येत्या काळात पहावे लागेल.


शेअर करा