राज्य सरकारकडून सूडबुद्धीचा प्रकार , लोकशाही चॅनलच्या संपादकांवरच गुन्हा दाखल

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारला प्रश्न विचारले की पत्रकारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रकरणे समोर येत असतानाच महाराष्ट्रात देखील त्याच धर्तीवर काम सुरू असल्याची टीका सर्व थरातून केली जात आहे. लोकशाही मराठी चॅनलचे संपादक असलेले कमलेश सुतार यांच्याविरोधात देखील किरीट सोमय्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अनेक राजकीय नेत्यांनी याविषयी राज्य सरकारच्या सूडबुद्धीबद्दल संताप व्यक्त केलेला आहे .

किरीट सोमय्या यांची एक क्लिप काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेली होती त्यानंतर ही क्लिप लोकशाही चॅनलने जशीच्या तशी दाखवली म्हणून लोकशाही मराठी चॅनेलचे संपादक असलेले कमलेश सुतार यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील पत्रकारांवरील कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. राज्य सरकारने हीच तत्परता बारसू प्रकरणात का दाखवली नाही ? असा खडा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे.

‘ जशीच्या तशी ‘ बातमी स्पष्टपणे दाखवली म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आता जशीच्या तशी बातमी दाखवणे म्हणजे काही गुन्हा ठरतो आहे का ? असा देखील संतप्त सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात असून जालन्यात मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्जनंतर राज्य सरकारच्या मनमानी कारभाराचे आणखीन एक उदाहरण म्हणून हा प्रकार समोर आलेला आहे. किरीट यांच्या तक्रारीनंतर संपादक कमलेश सुतार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत असून सर्व स्तरातून या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त केला जात आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली असून, ‘ राज्य सरकारच्या किंवा त्यांच्या एखाद्या नेत्याच्या विरोधात कोणी काही बोललं की,त्याच्यावर प्रचंड वेगाने गुन्हा दाखल करायचा,ही या सरकारची खोड आहे.आणि हे मी स्वतः मागील वर्षभरात अनेकवेळा अनुभवाल आहे. लोकशाहीचे कमलेश सुतार यांच्यावर देखील अश्याच पद्धतीने सुडबुद्धीच्या भावनेतून गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचा मी निषेध करतो. कमलेश आम्ही तुझ्यासोबत आहोत. असे म्हटले आहे.


शेअर करा