राममंदिराच्या वेळी पुन्हा एकदा.. , संजय राऊत यांनी व्यक्त केली भीती

शेअर करा

देशात सध्या भाजप सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती झालेली पहायला मिळत असून असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांच्या भावनेशी पुन्हा एकदा केंद्र सरकारकडून खेळण्यात येईल अशी शंका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे.

संजय राऊत म्हणाले की , ‘ अयोध्येचा मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयाने संपवलेला आहे मात्र आम्हाला भीती आहे की जसं पुलवामा घडवलं तसं राममंदिराच्या उदघाटनाच्या वेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेनने लोकांना बोलावले जाईल आणि राम मंदिराच्या उदघाटनाच्या वेळी एखाद्या दुसऱ्या ट्रेनवर दगडफेक केली जाईल. पुलवामानंतर धर्मांधतेचा आगडोंब पुन्हा एकदा देशात उसळवण्याचा प्रयत्न होईल ,’ असे म्हटलेले आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी देखील केंद्र सरकारवर पुलवामा हल्ल्याबद्दल गंभीर आरोप केलेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला ‘ तुम अभी चूप रहो ‘ अशा स्वरूपात धमकावलेले होते असे देखील जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलेले होते. इंडिया आघाडीत सध्या 26 पक्ष असून आणखीन दोन पक्ष सहभागी झालेले आहेत. 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी लोकांच्या मनात भीती निर्माण करावी म्हणून हा प्रकार केला जाईल याची शक्यता संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे.


शेअर करा