राममंदिर खुले होणार असले तरी भाविकांना मात्र..

शेअर करा

अयोध्येत राममंदिर पूर्णत्वाचे काम सुरू असून काही दिवसात राममंदिर जनतेसाठी खुले होणार आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात राम मंदिराचे उद्घाटन होण्याची शक्यता असून रामभक्तांना रामाच्या मूर्तीला हात लावण्याची संधी मिळणार नाही कारण भाविकांना गर्भगृहात प्रवेश दिला जाणार नाही तर सुमारे 35 फूट अंतरावरूनच देवाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गर्भगृहाचे पावित्र्य राखण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली असून मंदिराच्या गर्भग्रहात पूजा करण्याचा अधिकार फक्त राजा आणि मंदिरातील पुजाऱ्यांनाच राहणार आहे त्यामुळे रामभक्तांची देखील घोर निराशा होणार असून 35 फुटावरूनच देवाचे दर्शन त्यांना घ्यावे लागणार आहे.


शेअर करा