
देशात एक खळबळजनक प्रकरण चर्चेत आलेले असून उत्तर प्रदेशातील बरेली इथे एका व्यक्तीने दसऱ्याच्या दिवशी चक्क स्वतःच्या मेव्हण्याचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आणि त्यानंतर आपण स्वतः राम आहोत असे सांगून आपली मेव्हणे हे रावण कुंभकर्ण आणि बीभीषण आहेत असे म्हणत मी त्यांना मारणार आहे असे त्याने फेसबुक पोस्टवर म्हटलेले होते. त्याची ही पोस्ट भलतीच व्हायरल झाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला मात्र तो फरार झालेला होता.
उपलब्ध माहितीनुसार, दिनेश असे या व्यक्तीचे नाव असून अठरा वर्षांपूर्वी त्याचा विवाह झालेला होता. मेहुण्यांनी आपल्या बायकोचे कान भरत आपला संसार उध्वस्त केला असा त्याचा आरोप असून त्रस्त झालेल्या दिनेशचा मेव्हणा विनोद हा एके दिवशी त्याच्या बहिणीला माहेरी घेऊन आला. दिनेश याने अनेक वेळा त्याला आपल्या बायकोला सासरी पाठवण्याची विनंती केली मात्र त्याने तिला पाठवले नाही. दिनेश सध्या दिल्लीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो.
विजयादशमीच्या दिवशी दिल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात रावण दहनाचा कार्यक्रम करण्यात येतो. त्याचा प्रभाव दिनेशवर पडला आणि त्याने देखील फेसबुक पोस्ट लिहित आपल्या तीनही मेव्हण्यांचे फोटो पोस्ट केले आणि त्यानंतर रामाने रावणाचा वध केला त्याप्रमाणे मी माझ्या तीन मेहुण्याना बंदुकीने मारून टाकणार आहे अशी फेसबुक पोस्ट केली. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आणि संपर्कातील लोकांनी दिनेश याच्या सासुरवाडीला यासंदर्भात कळवले.
दिनेशच्या तिन्ही मेहुण्यांनी त्यानंतर पोलिस ठाणे गाठले अन दिनेशच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यावेळी दिनेश याने या आधी देखील आपल्याला व्हाट्सअप वर मेसेज पाठवून धमकी दिल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. पोलिसांनी सदर स्क्रीनशॉट आणि फेसबुक पोस्ट याच्या आधारे गुन्हा दाखल करून घेतलेला असून तपासाला सुरुवात केलेली आहे.