‘ राष्ट्रवादाची ढाल ‘ शेठ लॉबीने नाकारली , ‘ इतक्या ‘ लाख कोटींचे पुन्हा नुकसान

शेअर करा

अडाणी ग्रुपच्या शेअरची किंमत सतत घसरत असल्याचे दिसून येत असून आज सोमवारी अवघ्या काही तासांमध्ये अडाणी ग्रुपला तब्बल 153502 कोटी रुपयांचा तोटा झालेला असून अडाणी कंपनीच्या शेअरमध्ये घसरण होताच नेहमीप्रमाणे अडाणी ग्रुपकडून या प्रकाराला राष्ट्रवादाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आतापर्यंत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी जनतेशी संवाद साधताना आपल्या बाजूला तिरंगा ठेवलेला असतो मात्र चक्क हा प्रकार अडाणी ग्रुपच्या एका अधिकाऱ्याकडून करण्यात आल्यानंतर हा प्रकार कितपत योग्य ? याविषयी सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झालेली आहे. एखादा खाजगी उद्योग समूह अशा पद्धतीने बाजूला तिरंगा ठेवून राष्ट्रवादाची ढाल पुढे करत नागरिकांसमोर स्पष्टीकरण देऊ शकतो हे देखील या निमित्ताने प्रथमच पहायला मिळालेले आहे .

हिंडनबर्गच्या अहवालात अवघ्या 106 पानांमध्ये अडाणी ग्रुपच्या कारनाम्यांची जंत्रीच उघडकीला आणलेली असून त्यानंतर अडाणी समूहाच्या कंपन्यांचे शेअर धडाधडा कोसळत आहे. अडाणी समूहाकडून आत्तापर्यंत केंद्र सरकार नेहमी अपयश लपवण्यासाठीचा फंडा म्हणजे अर्थातच राष्ट्रवाद याचा वापर करून भारतातील जनतेला साद घालण्यात आलेली आहे सोबतच हिंडनबर्ग अहवाल प्रकाशित करणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कारवाईची तयारी करण्याची भाषा करण्यात आली आणि त्यानंतर तब्बल 413 पानांचे प्रेस रिलीज करून सर्व काही ठीकठाक आहे आणि ही भारताविरुद्ध साजिश आहे असे समूहाकडून सांगण्यात आले मात्र तरीदेखील सतत राष्ट्रवादाचे गाणे जाणाऱ्या शेठ समुदायाकडून अडाणी ग्रुपवर विश्वास दाखवण्यात आला नाही आणि अवघ्या काही तासात लाखो कोटी रुपयांचे नुकसान अडाणी ग्रुपला झालेले आहे.

अडाणी ग्रुपकडून हा तर देशावर हल्ला आहे असे सांगण्यात आलेले आहे मात्र तरीदेखील पंतप्रधान मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अद्यापपर्यंत याविषयी एक शब्द देखील उच्चारलेला नाही. हिंडनबर्गच्या कंपनीने याआधी देखील चीनच्या एका कंपनीचा अभ्यास करून अशाच स्वरूपाने अहवाल प्रकाशित केलेला होता त्यानंतर या कंपनीच्या बाजार मूल्यात तब्बल 98% घसरण झालेली होती आणि कंपनी हिवाळखोरीत निघाली. अशाच पद्धतीने अमेरिकेतील दोन कंपन्यांचा देखील हिंडनबर्गच्या अहवालाने भारतीय भाषेत सांगायचे तर करेक्ट कार्यक्रम केलेला आहे.

राष्ट्रवादाच्या आड लपणाऱ्या सरकारला आता समोर येऊन गुंतवणूकदारांना विश्वास देण्याची गरज असून येत्या काळात परिस्थिती आणखीन भीषण होण्याचा अंदाज आहे .एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे देखील सुमारे 78000 कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून या घडामोडीवर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि तपास यंत्रणा यांनी मौन का बाळगलेले आहे ? असा आरोप काँग्रेसने केलेला आहे. आम्ही लिहलेला शब्द न शब्द हा विचारपूर्वक लिहिलेला आहे हिंडनबर्गच्या समूहाने सांगितलेले असून आपल्या शेअरच्या किमती कमी व्हाव्यात म्हणून जाणीवपूर्वक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असा आरोप अडाणी समूहाने केलेला आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी याप्रकरणी भाष्य करताना, ‘ अडाणी समूहाने शेअरच्या किंमतीत फेरफार करून तसेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचा निष्कर्ष हिंडनबर्गच्या अहवालात काढण्यात आला तरी देखील एलआयसी आणि एसबीआय अजूनही या अडाणी समूहांमध्ये गुंतवणूक का करत आहे ? एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य 77 हजार कोटींवरन 55 हजार कोटीपर्यंत घसरलेले आहे मात्र आणखीन तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक एलआयसी या समूहात कुणाच्या आदेशावरून करते आहे ? असा देखील सवाल सुरजेवाला यांनी केलेला आहे.


शेअर करा