
भारत जोडो यात्रेला सुरुवात करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्याला संसदेत बोलू दिले जात नाही याविषयी चिंता व्यक्त केली होती. लोकांपर्यंत पोहचण्यासाठी भाजपने सर्व मार्ग बंद केलेले असल्याने आपल्याला अखेर रस्त्यावर उतरावे लागलेले आहेत असे देखील त्यांनी यावेळी म्हटले होते सोबतच मोदी आणि अडाणी यांच्यातील संबंधावर देखील टीका केलेली होती. देशात लागू करण्यात आलेली नोटबंदी, जीएसटी प्रकरणात विरोधी पक्षांना कुठल्याही प्रक्रियेत सामील करून घेतलेले नाही आणि एकतर्फी हे निर्णय घेण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितलेले होते. संसदेत बोलण्यासाठी म्हणून उभे राहिल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांचे माइक बंद केले जातात असे देखील त्यांनी अनेकदा म्हटलेले होते.
राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली असा ठपका समस्त भाजपच्या लोकांकडून ठेवण्यात आला देत असला तरी देखील राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलेले आहे त्याची देखील सध्या सोशल मीडिया जोरदार चर्चा आहे. राहुल गांधी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना , ‘ सदर विषय हा भारताचाच आहे आणि याचे उत्तर देखील भारतातूनच येईल ‘ असे समोरील व्यक्तीला सांगितले होते मात्र त्यानंतर भाजपच्या तमाम नेत्यांकडून राहुल गांधी यांनी जे काही बोललेच नाही त्याचाच संदर्भ जोडत त्यांच्यावर टीका सुरू करण्यात आली आहे सोबतच त्यांनी माफी मागण्याची देखील भाजपने मागणी केलेली आहे. मोदी आणि अडाणी यांच्यातील कथित संबंधावरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार करण्यात येत असल्याची देखील टीका आता सोशल मीडियात केली जात आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी ?
आज 17 तारखेला लोकसभेच्या लाईव्ह प्रक्षेपणादरम्यान राहुल गांधी यांना बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केलेली असताना सभागृहात ‘ राहुलजी को बोलने दो राहुलजी को बोलने दो ‘, अशा घोषणा सुरू झाल्यानंतर चक्क लोकसभेतील लाईव्ह प्रक्षेपणाचे प्रसारण केवळ चित्रात सुरू होते आणि माईक बंद केलेले होते हे देखील यावेळी दिसून आले. तब्बल 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ संपूर्ण संसद ही कुठल्याही आवाजाशिवाय लाईव्ह दिसत होती त्यानंतर ओम बिर्ला यांनी अखेर संसद तहकुब करत असल्याचे जाहीर केले . राहुल गांधी यांनी भाजपवर केलेल्या आरोपाची अखेर सत्यता समोर आली असून भारताच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडलेला आहे . संसदेत बोलू न देण्यासाठी माईक बंद करण्याचा हा प्रकार संपूर्ण जगभरात गेल्याने भारतातील लोकशाहीची प्रतिमा काही प्रमाणात का होईना डागाळलेली दिसून येत आहे.