
भारत जोडो यात्रेचा काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होत असून कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले जात आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कर्नाटकातील भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता मात्र अर्धा किलोमीटर चालल्यानंतर राहुल गांधी यांनी सोनिया गांधी आजारी असल्या कारणाने त्यांना पायी चालण्यापासून रोखले. दरम्यानच्या या कालावधीत सोनिया गांधी यांच्या बुटाची लेस राहुल गांधी यांनी बांधून दिली. त्याचे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून राहुल गांधी यांच्या साधेपणाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. सोनिया गांधी यांचा सहभाग हा काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणारा ठरला ठरलेला असून त्यांच्या या फोटोची देखील जोरदार चर्चा सुरू झालेली आहे.
भाजपच्या आयटी सेलकडून याआधी अनेकदा राहुल गांधी आणि गांधी परिवाराचे चारित्र्यहनन करण्यात आल्याचे प्रकार घडलेले आहेत. बहुतांश भाजप नेते देखील राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना त्यांची प्रतिमा बालिश असल्याची देखील टीका करतात मात्र प्रत्यक्षात भाजपचा खोटारडेपणा आता उघडकीस येत असून राहुल गांधी यांच्या साधेपणाचे भारतीय नागरिक फॅन झालेले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये राहुल गांधी यांनी सोनिया गांधींच्या बुटाची लेस बांधली त्यावर अनेक जणांनी त्यांना श्रावणबाळ असल्याची उपमा दिलेली आहे.
भारत जोडो यात्रा सुरू असताना या आधी देखील राहुल गांधी एका लहान मुलीला तिच्या पायात चप्पल घालताना मदत करताना दिसून आले होते. काँग्रेसच्या नेत्यांकडून या व्हिडिओबद्दल ‘ साधेपणा आणि प्रेम देशाला एकसंध ठेवण्यासाठी दोन्हींची गरज आहे ‘ असे म्हटले आहे . कोरोना संकटातून बऱ्या झाल्यानंतर सोनिया गांधी देखील सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून तळागाळातील सर्व नेते आणि नागरिक देखील काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून मात्र राहुल गांधी यांच्यावर थिल्लर स्वरूपाची टीका केली जात आहे तर गोदी मीडिया मध्ये देखील भारत जोडो यात्रेला कुठलेच स्थान दिले जात असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.