
भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून भाजपचे धाबे दणाणले पाहायला मिळत आहे. एकीकडे गोदी मीडियामध्ये भारत जोडो यात्रेला कुठली जागा दिसून येत नाही तर रस्त्यावर लाखोंच्या उपस्थित नागरिक राहुल गांधी यांच्यासोबत उतरत असल्याचे दिसून येत आहे. जनतेशी संबंधित असलेल्या मूलभूत प्रश्नांसाठी राहुल गांधी रस्त्यावर असून केरळमधून आता भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये पोहोचलेली आहे.
कर्नाटक पदयात्रेत राहुल गांधी यांनी एका ठिकाणी ऊस खात असतानाचा स्वतःचा फोटो शेअर केला होता त्यानंतर नेहमीप्रमाणे भाजपच्या नेत्यांकडून थिल्लर स्वरूपाची टीका सुरू झालेली असून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केलेले असून त्यामध्ये ,’ राहुल गांधी पंतप्रधान झाले नाहीत होणार नाहीत पण विको वज्रदंतीचे ब्रँड ॲम्बेसिडर नक्की होतील ‘ असे म्हटले आहे.

राहुल गांधी यांचे चारित्र्यहनन करून त्यांचे म्हणणे लोकांनी ऐकूच नये यासाठी त्यांना बालीश विचारांचा नेता अशी इमेज बनवण्याचे प्रयत्न भाजपकडून करण्यात आलेले आहेत मात्र सध्याच्या परिस्थितीत भाजपचे नेते हेच बालिश ठरत असून राहुल गांधी यांच्या प्रश्नांवर उत्तरे देण्यासाठी सत्ताधारी बांधील असतानादेखील थिल्लर स्वरूपाची टीका ही भाजपला उघडे करत आहे.