लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन.. , वाळूजमध्ये घडलं हत्याकांड

शेअर करा

एक अत्यंत खळबळजनक अशी घटना छत्रपती संभाजीनगर इथे उघडकीला आलेली होती. वाळूज एमआयडीसी परिसरात शुक्रवारी एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. सदर प्रकरणात आरोपी पतीने पत्नी आणि मुलीची हत्या करून त्यानंतर स्वतः गळफास घेतल्याचे देखील समोर आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मोहन प्रताप डांगर ( वय 28 ), पूजा मोहन डांगर ( वय 24 ) आणि श्रेया मोहन डांगर (वय चार ) अशी मयत व्यक्तींची नावे असून सुरुवातीला हत्या केल्यानंतर आरोपीने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने घराशेजारी असलेल्या सासुरवाडीत आरोपीने पत्नीला नेऊन संशयातून तिचा आणि चार वर्षाच्या मुलीचा खून केल्याचे समोर आलेले आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याने पत्नी पूजा आणि मुलगी श्रेया यांना एकाच दोरीने गळफास दिला आणि त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली.

आरोपी मोहन याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. आरोपीने यातून स्वतःच्याच पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ देखील व्हायरल केलेले होते त्यानंतर त्याच्यावर प्राणघातक हल्ला तसेच कुटुंबीयांच्या विरोधात देखील वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याकारणाने कोर्टात प्रकरण गेलेले होते. लेकीच्या काळजीपोटी मोहनची सासू त्यांच्या शेजारी भाड्याने घर घेऊन राहत होत्या.

आरोपी मोहन याची मुलगी श्रेया आजीकडे चहा घेण्यासाठी जात असायची मात्र शुक्रवारी ती आली नाही म्हणून आजीने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला त्यावेळी आतून प्रतिसाद आला नाही. गुरुवारी त्यांच्यात भांडण झाल्याचे आवाज पूजा यांच्या आईला आलेले होते मात्र आता प्रतिसाद येत नसल्याने त्यांचा संशय बळावला . शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला त्यावेळी हा प्रकार समोर आलेला आहे. आरोपी मोहन याने लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणलेला होता. केक घेऊन तो त्याच्या घरात गेला आणि त्यानंतर सासूच्या घरातून पत्नीला आणि मुलीला आपल्याकडे येण्यासाठी सांगितले. श्रेया हिला केक खायला मिळेल या आशेने ती आईसोबत गेली त्यानंतर आरोपीने केक कापल्यानंतर पत्नी आणि मुलीची हत्या केली आणि स्वतः देखील त्यानंतर गळफास घेतला त्यात त्याचाही मृत्यू झालेला आहे.


शेअर करा