‘ लग्नाची बायको ‘ तरीही पोलिसांकडून वसुली मग मात्र..

शेअर करा

वसुली

पोलिसांच्या काही कारवाईची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होते असेच एक प्रकरण सध्या बंगळुरू येथे समोर आलेले असून कर्नाटक राज्यातील बंगळुरू पोलिसांनी चक्क रात्री अकरा वाजता चालत घरी जाणाऱ्या दाम्पत्याकडून वसुली केलेली आहे. कायदा मोडला म्हणून दंड करत पोलिसांनी तीन हजार रुपये मागितले आणि त्यानंतर तोडपाणी करत एक हजार रुपये भरल्यावर या दाम्पत्याची सुटका करण्यात आली.

कार्तिक पत्री नावाच्या एका ट्विटर युजरने ही माहिती ट्विटरवर सांगितलेली असून त्यांनी म्हटले आहे की, ‘ घराजवळ असलेल्या मित्राचा वाढदिवस साजरा करून आम्ही रात्री साडेबाराच्या सुमारास पती-पत्नी परतत होतो त्यावेळी घरापासून जवळ असलेल्या बस्ती वाहनातून दोन पोलीस उतरले आणि आमच्याकडे आधार कार्ड मागितले. आधार कार्ड दाखवल्यानंतर त्यांनी दोघांचेही फोन जप्त केले आणि तुमच्या दोघांचे नाते नक्की काय आहे अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले इतकी माहिती देऊन देखील पोलिसांनी चलनसाठी नाव नोंदवले आणि मग घरी जाऊ दिले.

तुम्ही चलन का आकारत आहात ? असे विचारल्यानंतर पोलिसाने रात्री अकरानंतर रस्त्यावर फिरण्याची परवानगी नाही. तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना नियम माहिती पाहिजे असे सांगत ओरडून दमदाटी देखील केली. रात्र खूप झाल्यामुळे पोलिसांशी वाद घालण्यात अर्थ नाही म्हणून या दाम्पत्याने त्यांना पुन्हा आम्ही रस्त्यावर फिरणार नाही असे सांगत माफी मागितली मात्र पोलिसांनी त्यासाठी तीन हजार रुपये मागितले. सदर प्रकार सुरू असताना त्यातील एक जण या व्यक्तीला कार्तिक यांना बाजूला घेऊन गेला आणि हजार रुपये देऊन टाक असे सांगत त्यांना सल्ला दिला.

कार्तिक यांनी त्यानंतर पोलिसांना हजार रुपये दिले मात्र सोशल मीडियावर हा प्रकार शेअर केला आणि त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर होऊन वरिष्ठांपर्यंत पोहोचली वरिष्ठांनी त्या वेळी कार्यरत असलेल्या दोन्ही पोलिसांचे निलंबन केले असून त्यांनी केलेले काम हे बेकायदा आहे अशा कामाचे कदापि समर्थन केले जाऊ शकत नाही, असे देखील म्हटले आहे .


शेअर करा