लग्न होऊनही हवा होता प्रियकराचा ‘ सहवास ‘ , महिलेसह प्रियकर ताब्यात

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना नाशिक जिल्ह्यात समोर आली असून कातरवाडी येथील खुनाच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका तरुण शेतकऱ्याच्या खुनाची घटना कातरवाडी येथे समोर आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 48 तासात त्याच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकलेल्या असून अनैतिक संबंधात पतीची अडचण असल्याने पत्नीने आणि तिच्या प्रियकर मित्राने या शेतकऱ्याचा खून केल्याचे समोर आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सोपान झाल्टे असे मयत शेतकऱ्याचे नाव असून आपला पती मळ्यात झोपायला गेलेला आहे याची माहिती पत्नीने प्रियकराला दिली होती त्यानंतर आरोपी प्रियकराने त्याच्या काही मित्रांना सोबत घेत लाकडी दांड्याने सोपान यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला. सोपान यांचे वडील मध्ये पडल्यामुळे त्यांना देखील आरोपींनी मारहाण केली असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

सदर प्रकरण समोर आल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिस दलाने कुटुंबियांना माहिती विचारली त्यावेळी पत्नी उलटसुलट उत्तरे देत असल्याने पोलिसांना तिचा संशय आला होता त्यानंतर तिच्या मोबाइलचे रेकॉर्ड काढले असता ती एका व्यक्तीशी सतत संपर्कात असल्याचे आढळून आले होते. तिचा प्रियकर असलेला सुभाष संसारे याच्यासोबत ती सतत बोलत असायची. सोपान याचा विवाहबाह्य प्रेमाला विरोध होत असल्याने पत्नीने त्याला मारण्याचा प्लॅन केला. त्याची पत्नी मनिषा आणि तिचा प्रियकर सुभाष यांनी सुभाष याच्या काही मित्रांना सोबत घेऊन सोपान यांचा अमानुषपणे खून केला.

सोपान हे ट्रकचालक असून शेतीचा देखील व्यवसाय करत होते. मनीषा हिचे लग्नापूर्वीपासून सुभाष याच्यासोबत प्रेमसंबंध होते अशीही माहिती समोर आलेली आहे. सुभाष याने मनमाड येथील खलील नावाच्या एका मित्राला सोबत घेतले आणि त्यानंतर सोपान यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तीनही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या असून अवघ्या काही तासात या प्रकरणाचा उलगडा केल्यामुळे पोलिसांचे परिसरात कौतुक केले जात आहे.


शेअर करा