लहान बाळ सोबत अन दिव्यांग महिलेला बोलता येईना , हातावर गोंदलयं की ?

शेअर करा

महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दिव्यांग महिला लहान बाळासोबत आढळून आलेली असून 23 मार्च 2022 पासून ती परिसरात राहत आहे. तिच्या वारसाचा जिल्ह्यात शोध घेतला असता कुणीही आढळून आलेले नसून सदर महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिलेली आहे.

पिंपळेश्वर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 23 मार्च 2022 रोजी ही दिव्यांग महिला आढळून आलेली होती. महिलेला बोलता येत नसून तिच्यासोबत एक लहान बाळ देखील आहे. सध्या त्यांना शासकीय आशादीप महिला वसतिगृह येथे दाखल करण्यात आलेले असून 35 ते 40 वर्षांची ही महिला रंगाने गोरी शरीराने सडपातळ उंची पाच फूट दोन इंच आणि तिच्या उजव्या हातावर रेवती असे नाव बोललेले आहे तर डाव्या हातावर ‘ ठेरनिमो अजगिया ‘असे गोंदवलेले आहे. तिच्यासोबतचे बाळ हे तीन वर्षांचे असून जळगावमध्ये पोलिसांनी याप्रकरणी शोध घेतला मात्र अद्यापपर्यंत कोणीही तिची ओळख पटवण्यासाठी समोर आलेले नाही.

पोलिसांनी याप्रकरणी आवाहन केलेलं असून सदर महिलेला कोणी ओळखत असल्यास शासकीय आशादीप वसतिगृह जळगाव येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेले आहे. आपापल्या परिसरातील मोबाईल व्हाट्सअप ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम तसेच इतर सोशल सोशल मीडियावर सदर महिलेचा फोटो पाठवल्यास तिच्या वारसांचा शोध घेणे सोपे होईल म्हणून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी केलेले आहे.


शेअर करा