लुटून लुटून झालं अन ‘ इलेक्शन मोड ‘ वर भाजप आलं , घरगुती गॅसबद्दल मोठा निर्णय पण.

शेअर करा

कोरोना काळात नागरिकांचा कुठलाही विचार न करता अवघ्या काही मिनिटात लॉकडाऊन घोषित करून लाखो नागरिकांना पायपीट करायला लावल्यानंतर तसेच नागरिकांच्या अर्थकारणाचा कुठलाही विचार न करता अवघ्या काही मिनिटांमध्ये गॅसच्या किमतीत वाढ करण्यात आल्यानंतर अन रोजगार निर्मिती करण्यात संपूर्णपणे अपयशी ठरल्यानंतर लोकसभा निवडणुका लागताच भाजप सरकारला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्याची अचानक इच्छा जागृत झालेली असून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची किंमत दोनशे रुपयांनी स्वस्त होणार असल्याचे वृत्त आहे. अद्यापपर्यंत तरी सिलेंडरची किंमत खाली आलेली नसली तरी गोदी मीडियाने पिटारा वाजवायला सुरुवात केलेली आहे.

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरवर दोनशे रुपयांची सबसिडी देण्यात आल्याचा निर्णय केंद्राने (अखेर ? ) घेतलेला असून या सबसिडीमुळे घरगुती गॅस सिलिंडर दोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे. एकीकडे पालेभाज्यांपासून तर अन्नधान्यांपर्यंत अन पेट्रोलपासून डिझेलपर्यंत सर्वच गोष्टींच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असल्याने सामान्य नागरिकांचे बजेट पूर्णपणे कोलमडलेले आहे. पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झाल्यानंतर वाहतूक खर्च वाढला आणि देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली . सत्तेत आल्यानंतर सामान्य नागरिकांना दिलासा न देता केवळ उद्योजकांचे खिसे भरणाऱ्या आणि आहे ते सगळं उद्योजकांच्या खिशात घालणाऱ्या भाजप सरकारला आता पुन्हा एकदा मतांसाठी नागरिकांना दिलासा देणारे निर्णय घेण्याची गरज निर्माण झालेली असून सध्याच्या परिस्थितीत घरगुती गॅसचे दर अकराशे ते बाराशे रुपये आहेत तर दुसरीकडे काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये अद्यापही गॅस सिलेंडर अवघ्या पाचशे रुपयात मिळत आहे .

काँग्रेसच्या राज्यात पाचशे रुपयांना गॅस सिलेंडर मिळत असला तरी गोदी मीडियाला मात्र हे वृत्त दाखवण्याची कधीही गरज वाटलेली नाही उलट भाजपशासित राज्यात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तुम्ही किती सुरक्षित आहात याचाच पिटारा रोज गोदी चॅनल वाजवत असून अवघ्या दोनशे रुपयांचा दिलासा दिल्यानंतर यापूर्वी वाढलेली महागाई पुन्हा कमी होणार आहे का ? असा देखील एक प्रश्न आहे. सर्वच ठिकाणी सुमारे 30 ते 35 टक्के किमती वाढलेल्या असून नागरिकांचे महागाईमुळे पूर्ण बजेट कोलमडलेले आहे. एकीकडे रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत तर दुसरीकडे वाढती महागाई नागरिकांचा खिसा रोज रिकामा करत आहे.


शेअर करा