लोकसभा निवडणूकीचे ‘ गाजर ‘ आले , व्यावसायिक गॅस सिलिंडर देखील आता ..

शेअर करा

लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसेच मोठे दिलासादायक निर्णय घेण्याचे केंद्राचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून घरगुती गॅस सिलेंडर दोनशे रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये देखील 157 रुपये दर कपात करण्यात आलेली आहे. आधी वाढलेली महागाई यामुळे कमी होण्याची मात्र सुतराम शक्यता दिसून येत नाही .

काँग्रेसच्या काळात अवघ्या चारशे रुपयांना मिळणारा घरगुती सिलेंडर भाजप सत्तेत आल्यानंतर बाराशे रुपयांपर्यंत पोहोचलेला होता . इतर इंधनाचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतूक खर्च देखील वाढला आणि त्यानंतर सगळीकडे महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता दर काही प्रमाणात जरी कमी केले असले तरी यामुळे वाढलेली महागाई कमी कशी होणार ? हा एक प्रश्न आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर आता 900 रुपयांच्या दरम्यान असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर आता पंधराशेच्या आसपास राहणार आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दर यापूर्वी सुमारे साडेसोळाशे रुपयांच्या दरम्यान होता.


शेअर करा