वडिलांच्या प्रेयसीच्या मुलीसोबतच मुलाचे प्रेमसंबंध सुरु झाले अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक घटना सोलापूर येथे समोर आली असून प्रेमप्रकरणातून एका व्यक्तीने चक्क त्याच्या वडिलांचा जाळून खून केलेला आहे. प्रेमासाठी या मुलाने त्याच्या बापाचा खून केल्यानंतर पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे . सदर हत्याकांड हे प्रेमप्रकरणातून घडल्याचे समोर आले असून मयत व्यक्तीचे नाव अफजल बागवान असे असल्याचे समजते. अफजल यांचा मुलगा सोहेल याला तीन मुलांसोबत पोलिसांनी ताब्यात घेतले असून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील ही घटना आहे .

अफजल बागवान यांचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि त्यातून ते अनेकदा या महिलेच्या घरी देखील रात्री मुक्कामाला थांबत असत आणि या प्रकाराची त्यांचा मुलगा असलेला सोहेल याला कल्पना होती. काही दिवसांनंतर याच महिलेच्या अल्पवयीन मुलीसोबत सोहेल याचे प्रेमसंबंध सुरू झाले आणि तो त्या मुलीसोबत लग्न करण्याची मागणी वडिलांकडे करत होता. ही बाब समोर आल्यानंतर अफजल यांनी त्याला या मुलीपासून दूर राहण्यासाठी सांगितले होते मात्र या अल्पवयीन मुलीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सोहेल याने आपल्याच वडिलांचा काटा काढण्याचे ठरवले.

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे अफजल बागवान यांना आधी घेऊन जाण्यात आले आणि त्यानंतर डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण केली त्यानंतर डोक्यात दगड टाकून त्यांचा खून करण्यात आला आणि पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले. सदर घटनेत अफजल बागवान यांचा मृत्यू झालेला असून अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडल्यानंतर पोटच्या मुलाने वडिलांचा अत्यंत अमानुषपणे खून केल्याचे समोर आले आहे .


शेअर करा