
देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आली असून एका तरुणीने सोशल मीडियाचा वापर करून एका तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले मात्र त्याला न मारता तिने दुसऱ्या एका तरुणीचा खून केलेला आहे. आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तिने हा कट रचला असण्याची देखील माहिती समोर आलेली आहे मात्र धक्कादायक म्हणजे ती त्याच्याच प्रेमात पडली. नोएडा येथील हे वृत्त आहे .
उपलब्ध माहितीनुसार, पायल असे हत्या करणार्या तरुणीचे नाव असून काही महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचा खून करण्यात आला होता त्यातून तिने आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. वडिलांचा खून प्रकरणी आरोपी असलेला अजय याच्याशी पायल हिने फेसबुकवरून संपर्क साधला आणि अजयला आपल्या जाळ्यात अडकवले. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर पायल हिने त्यानंतर ठरलेला प्लान अमलात आणायला सुरुवात केली
अजय हा पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकलेला आहे म्हणून त्याच्यासोबत राहण्यासाठी तिने अजय याला तिच्यासारखी शरीरयष्टी असलेली दुसरी मुलगी शोधण्यास सांगितले आणि त्यानंतर दोघांनी मिळून त्या मुलीचा खून केला. तिची ओळख पटू नये म्हणून त्या मुलीला पायल हिने तिच्यासारखे कपडे देखील घालून तिच्या अंगावर चेहऱ्यावर ॲसिड टाकण्यात आले आणि तिचा मृतदेह लोकांना दिसेल अशा ठिकाणी ठेवून देण्यात आला आणि त्यानंतर पायल तिच्या घरातून बेपत्ता झाली.
पायल बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांना चिंता वाटू लागली म्हणून त्यांनी अखेर पोलिसात जाऊन ती बेपत्ता असलेली तक्रार नसल्याची तक्रार नोंदवली . पोलिसांना दरम्यानच्या काळात मृतदेह सापडला होता म्हणून ती पायल आहे की नाही याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना बोलावले मात्र ऍसिडमुळे चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता मात्र तरीही कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले मात्र जी मुलगी बेपत्ता झाली होती तिच्या कुटुंबीयांनी देखील पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांच्या मनात संशय आला आणि तपासाला सुरुवात झाली.
पोलीस तपास सुरू असताना पायल ही अजयसोबत आढळून आली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले त्यावेळी तिने आपला गुन्हा कबुल केला असून वडिलांनंतर अजयने आपलाही खून केलेला आहे हे असे आपल्याला दाखवायचे होते म्हणून आपण या मुलीचा खून केला असे सांगितले असून फेसबूक चॅटिंगमधून अजयला आपल्या जाळ्यात अडकवले होते असे देखील तिने सांगितले आहे. पोलिसांनी त्यांना मदत करणाऱ्या इतर चार जणांना ताब्यात घेतले आहे.