‘ वर्किंग वूमन ‘ वर बेल्ड मारणारा आरोपी ताब्यात , कारणही असे सांगितले की..

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या बरेली इथे समोर आलेले असून एका व्यक्तीने चार तरुणींवर ब्लेडने वार केल्याचा प्रकार समोर आलेला होता. आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अद्यापपर्यंत यश आलेले नव्हते मात्र तब्बल साडेतीनशेपेक्षा जास्त कॅमेरे पोलिसांनी तपासले आणि त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे आरोपी हा सातत्याने वर्किंग वुमन असलेल्या महिलांवर हल्ले करायचा हे देखील समोर आलेले असून हल्ल्यामागचे कारण देखील तितकेच वेगळे आणि विचित्र आहे.

बरेली शहरात ब्लेडमॅन नावाने ब्लेड मॅन अशी त्याची ओळख बनलेली होती. परिसरात काम करणाऱ्या वर्किंग वुमन त्याच्या निशाण्यावर असायच्या. महिलांच्या चेहऱ्यावर पाठीवर त्याने ब्लेडने हल्ला केलेला होता. सर्व तरुणींनी आरोपी हा दुचाकीवरून आला होता असे सांगितले त्यानंतर पोलिसांकडून मनोरुग्ण असलेल्या व्यक्तींचा देखील तपास करण्यात आला मात्र तो जाळ्यात आलेला नव्हता. पोलिसांनी यासाठी विशेष टीम तयार केली आणि साडेतीनशेपेक्षा जास्त कॅमेऱ्याच्या माध्यमातून अखेर त्याची ओळख पटवण्यात आली.

सज्जाद पुत्र अन्वर ( वय 42 ) असे या आरोपीचे नाव असून त्याची आत्तापर्यंत दोन लग्न मोडलेली आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव त्याच्या सबिहा असून त्यांना दोन मुले देखील आहेत. काही दिवसांपूर्वी त्याची ओळख जगतपूर येथे राहणाऱ्या फराशी ( वय 25 ) हिच्यासोबत झालेली होती त्यानंतर त्यांचा निकाहा झाला मात्र त्याच्या पत्नीने त्याच्यावर खोटा एफआयआर दाखल केला आणि त्याच्याकडून वीस लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर ती त्याला सोडून गेली तेव्हापासून त्याला तरुणींचा तिटकारा निर्माण झाला आणि त्यातून त्याने हा प्रकार सुरू केलेला होता. कुतुबखाना येथून जात असताना मुली पाहिल्यानंतर आपल्याला राग यायचा त्यातून आपण हा प्रकार करत होतो असेही त्याने म्हटलेले आहे.

पोलिसांनी त्याला अधिक खोदून माहिती विचारली त्यावेळी त्याने आपल्या दुसऱ्या पत्नीबरोबर वाद झाल्यानंतर आपण एका मांत्रिकाचा सल्ला घेतलेला होता त्यावेळी या मांत्रिकाने प्रकरण लवकरात लवकर मिटवायचे असेल तर चाकू किंवा ब्लेडने तीन कामावर जाणाऱ्या महिलांवर हल्ला कर त्यानंतर तुझी केस लवकरच संपेल असे सांगितले होते त्यानुसार आपण हे प्रकार केलेले आहेत असे म्हटलेले असून पोलीस त्याला असा सल्ला देणाऱ्या मांत्रिकाचा देखील शोध घेत आहेत.


शेअर करा