
राज्यात नवीन वाळू धोरण लागू करण्यात आलेले असले तरीदेखील नियोजन नसल्याने तलाठी बांधवांवर असलेला कामाचा दबाव काही कमी झालेला नाही. परभणीच्या जिंतूर तालुक्यात डिग्रस येथे एक धक्कादायक घटना घडलेली असून अवैध वाळू उपसा करण्यासाठी सुरू असल्याने कारवाईसाठी गेलेले तलाठी पाण्यात बुडालेले असून अखेर त्यांचा मृतदेह हाती आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सुभाष होळ असे या तलाठी व्यक्तीचे नाव असून जिंतूर तालुक्यातील डिग्रस येथे पूर्णा नदीच्या पात्रातून हिंगोली आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असतो त्यावर कारवाई करण्यासाठी तलाठी असलेले सुभाष होळ ,तलाठी धनंजय सोनवणे आणि स्थानिक पोलीस पाटील हे डिग्रस येथील या ठिकाणी गेलेले होते.
तिथे पोहोचल्यानंतर वाळू उपसा बंद होता मात्र नदीपात्राच्या पलीकडील भागात वाळू उपसा सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यावेळी कारवाई करण्यासाठी पाण्यातून पलीकडे पोहत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली मात्र पलीकडच्या काठावर जाण्याचा प्रयत्न करत असतानाच ते पाण्यात बुडाले . परभणी येथील एन डी आर एफ चे पथक तिथे पोहोचले अन त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते मात्र अखेर ४८ तासांनी त्यांचा मृतदेहचं हाती आलेला आहे .