विवस्त्र अवस्थेत महिलेचा हॉटेलमध्ये धिंगाणा , व्हिडीओ व्हायरल

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून देशात हा प्रकार बहुधा प्रथमच घडलेला आहे. एका परदेशी महिलेने राजस्थान येथील एका हॉटेलमध्ये चक्क नग्न अवस्थेत धुमाकूळ घातलेला आहे आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्याला देखील तिने जोरदार मारहाण केलेली आहे. डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असा हा व्हिडीओ असून सदर महिला नशेच्या धुंदीत होती का ? याचा देखील सध्या शोध पोलीस तपास करत आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही महिला जोरदार तमाशा करत असून हॉटेलच्या रूमच्या बाहेर ती आलेली आहे त्यावेळी तिच्या अंगावर एकही कपडा नाही. पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत ती बाहेर आली आणि त्यानंतर तिने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ सुरू केली. हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये हा प्रकार या महिलेने केला आणि कर्मचाऱ्याला मारहाण केली.

राजस्थानमधील जयपूर येथील हा व्हिडिओ असून सदर महिला ही परदेशी असल्याची माहिती आहे. हॉटेलच्या महिला कर्मचाऱ्यांना देखील ती मारते आणि पुरुषांना देखील ती मारहाण करताना दिसून येत आहे. सदर महिला इतकी संतप्त का झाली होती आणि तिने हा प्रकार का केला ? हे अद्यापपर्यंत समोर आले नाही मात्र तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


शेअर करा