विहिरीत बुडताना दोरीने बाहेर काढून अखेर लग्न लावले

शेअर करा

देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आले असून बिहारमधील छपरा इथे एक प्रियकर हा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी रात्री तिच्या घरी गेला होता मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांना एकत्रितरित्या पाहिले आणि त्यानंतर त्याने मारहाण होण्याच्या भीतीने चक्क विहिरीत उडी घेतली. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्याला दोरी टाकून बाहेर काढले आणि त्यानंतर त्यांचे लग्न लावून देण्यात आले.

शुक्रवारी रात्री हा तरुण त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. रात्रीच्या अंधारात आपल्याला कुणी पाहणार नाही अशी त्यांची अपेक्षा होती मात्र तरुणीचे कुटुंबीय हे त्याच्यावर पाळत ठेवून होते आणि तो दिसताच त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. तरुणीच्या कुटुंबीयांनी आपल्याला पकडले तर आता जोरदार मारहाण होईल म्हणून घाबरलेल्या या तरुणाने अखेर विहिरीत उडी मारली मात्र तिच्या घरच्यांनी त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्यांचे लग्न लावून दिले.

मुन्ना राज असे या तरुणाचे नाव असून त्याचे सोनू कुमारी नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. रात्री गुप्तपणे भेटण्यासाठी तो तिच्या घरी गेला मात्र तरुणीच्या नातेवाईकांच्या तावडीत सापडला आणि त्याने मार चुकवण्याच्या भीतीने विहिरीत उडी मारली. चार वर्षांपासून त्यांचे हे प्रेमसंबंध सुरू होते. घरी देखील या प्रकरणी माहिती असल्याने तरुणीचे कुटुंबीयदेखील सावध भूमिकेत होते. त्यांनी त्याला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग सुरू केला होता. विहिरीतून बाहेर काढल्यावर त्यांचे लग्न लावून देण्यात आले असून शेवट गोड झाल्यामुळे या प्रेमीयुगुलाला दिलासा मिळालेला आहे.


शेअर करा