‘ वेगळं पाऊल उचलतोय ‘, मोबाईल स्टेटसने पोलीस झाले सक्रीय पण..

शेअर करा

काही दिवसांपूर्वी विरार येथे एका महिलेचा मृतदेह राहत्या घरात आढळून आलेला होता . पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली त्यानंतर अवघ्या काही दिवसात महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकललेले असून नवविवाहित पत्नीला चारित्र्याच्या संशयावरूनच पतीने मारल्याचे तपासात समोर आलेले आहे. विरार पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला असून एक जणाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत तर महिलेचा पती मात्र अद्यापही फरार आहे. महिलेच्या पतीच्या मोबाईल स्टेटसवरून पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे जुळवत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, विरार येथील कोपरी गावात शंकरपाडा परिसरात वैभव पाटील हा त्याची पत्नी प्रियंका पाटील हिच्यासोबत राहत होता. एक फेब्रुवारी रोजी प्रियंका पाटील हिचा मृतदेह तिच्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी हा मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवण्यात आलेला होता त्यानंतर तिची हत्या गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली आणि त्यानंतर तपासाला सुरुवात केली.

मयत महिलेचा पती वैभव पाटील हा एका डेअरीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्याची पत्नी ही इतर ठिकाणी कंपनीत कामाला जात होती. तिथे तिचे अनैतिक संबंध आहेत असा आरोपीला संशय होता त्यातून भांडण झाल्यावर त्याने तिचा खून केला आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला. पोलीस पोचले त्यावेळी पती बेपत्ता असल्याने त्याच्यावरच पोलिसांनी संशयाची सुई ठेवलेली होती मात्र तो आढळून येत नव्हता.

पोलिसांनी त्यानंतर त्यांच्या मोबाईलचे शेवटचे स्टेटस चेक केले तेव्हा ‘ आई-वडिलांनी मला माफ करावे मी आता वेगळे पाऊल उचलत आहे ‘ असे लिहिलेले आढळून आल्यानंतर खुनाचा गुन्हा घडला त्या दिवशी त्याच्यासोबत त्याचा मित्र असलेला संकेत राऊत हा दारू पिण्यासाठी बसलेला होता हे समोर आल्यावर संकेत याला ताब्यात घेतले तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झालेला असून अद्यापही या महिलेचा पती पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही.


शेअर करा